आयुष्मान सांगतोय, परफेक्ट Gentleman ची व्याख्या

संवेदनशील अभिनेता म्हणून आयुष्मानची ओळख 

Updated: Nov 12, 2019, 12:11 PM IST
आयुष्मान सांगतोय, परफेक्ट Gentleman ची व्याख्या  title=

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून तो बॉलिवूडचा 'Gentleman' असल्याचं अधोरेखित केलं आहेत. आयुष्मानचा 'बाल' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून नुकताच त्याचा 3 मिनिटाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने (What makes a perfect Gentleman) आदर्श पुरूषाशी व्याख्या सांगितली आहे. 

19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या (International Men's Day) जागतिक पुरूष दिनानिमित्त हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत आयुष्मानचा लूक अतिशय casuals असून तो लक्षवेधी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

‪This coming International Men’s Day let’s find out with me and @themancompany ‬ ‪#themancompany #gentlemaninyou

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

व्हिडिओच्या सुरूवातीला त्याने आतापर्यंत पुरूषांची कथित असलेली व्याख्या सांगितली आहे. पुरूष म्हणजे जो माचो (Macho) आहे. पुरूष म्हणजे जो कमकुवत नाही. पुरूष म्हणजे जो कधीच रडत नाही. पण पुढे आयुष्मान म्हणतो,'मुझे ना हिरो, ना सेव्हिअर, ना सुपरमॅन बनना था... जो रो सके, जो गा सके... किसीको बचापाए तो बचा सके, ऐसा मॅन बनना था....'  

या व्हिडिओत आयुष्मान बोलतो की, मला योग्य टाय बांधता येत नाही पण मला जेवण चांगल बनवता येतं. प्रत्येक बाप मुलाला आदर्श पुरूष (Gentleman) बनायला सांगतो पण कुणीही मुलाला आदर्श पुरूष म्हणजे नक्की काय? हे नाही सांगत. मुली मरतील असा परफ्युम लावायचा असतो पण त्यांना मुली का मरतील?असा प्रश्न विचारणारा कुणी नसतो. 

आदर्श पुरूषाची खरी व्याख्या आयुष्मानने या व्हिडिओत सांगितली आहे. आयुष्मान म्हणतो की,'पर...मर्द होने की इएलौती शर्थ यही है की, वो सच्चा हो' त्यानंतर आयुष्मान सांगतो की,'जिसको दर्द होता है, असल में वही मर्द होता है '. या व्हिडिओचा शेवट आयुष्मानने असा केला आहे की, 'तुम्ही कार्पेटवर झोपा अथवा रेड कार्पेटवर चाला... तुम्ही  Gentleman असाल तर तुम्ही सबळ असाल हे लक्षात ठेवा.'