Ayushmann Khurrana Home Tour : आलिशान घरासाठी अभिनेत्याने खर्च केले इतके कोटी

अभिनेता आयुषमान खुराना बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

Updated: Sep 16, 2021, 02:42 PM IST
Ayushmann Khurrana Home Tour : आलिशान घरासाठी अभिनेत्याने खर्च केले इतके कोटी title=

मुंबई :  अभिनेता आयुषमान खुराना बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने मेहनत करुन स्वत:चं आलिशान घर तयार केलं आहे. या घरासाठी त्याने मोठी रक्कम खर्च केली आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप स्वतः घर स्वच्छ करण्यावर विश्वास ठेवते.

तर आयुष्मान खुराना यांनी जिंकलेले पुरस्कार येथे आहेत. घराच्या एका वॉलजवळ त्याने जिंकलेले पुरस्कार ठेवले जातात.. बऱ्याचदा आयुष्मानच्या फोटोमध्ये हे पुरस्कार पाहायला मिळतात.

आयुष्मान खुरानाची पत्नी पाऊस आणि मोकळी हवा घेण्यासाठी अनेकदा बाल्कनीत फोटो क्लिक करते. आयुष्मान खुरानाने त्याच्या घराला टोटल व्हाईट लूक दिला आहे. आयुष्मान खुराना आणि त्यांची पत्नी ताहिरा कश्यप यांच्यासह त्यांच्या इच्छेनुसार बेडरूमचा प्रत्येक कोपरा सजवण्यात आला आहे.

आयुषमान खुरानाने गायनाचा सराव करण्यासाठी त्याच्या घरात एक वेगळी खोली बनवली आहे, ज्यामध्ये तो पियानो वाजवताना दिसतो.