मुंबई : 'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर'या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय. भारतात एवढी जबरदस्त कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरलाय. ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई केलीय. या वर्षी प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी-२ चाही रेकॉर्ड या चित्रपटाने मोडलाय. 'बागी २'ने पहिल्या दिवशी २५ कोटींची कमाई केली होती.. तसेच या चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘दंगल’, ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
आजवर कुठल्याही हॉलीवुडपटाने भारतात एवढी कमाई पहिल्याच दिवशी केली नव्हती... ‘डिस्ने इंडिया’ने प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार या चित्रपटाने देशभरात ४० कोटी रुपयांची कमाई केली असून यावर्षीचा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
रोसो ब्रदर्स अर्थातच एंथोनी रोसो और जो रोसो दिग्दर्शित एवेंजर्स इन्फीनिटी वॉर या सिनेमाची सुरुवात होतेयातली नेगेटिव्ह व्यक्तिरेखा साकरणाऱ्या थैनॉसच्या एंट्रीनं. टाइटन गृहामध्ये राहणाऱ्या थैनॉस मण्यांच्या शोधात आहे. याच मण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे आयनमॅन, हल्क, थोर, ब्लैक विडो, स्पायडरमॅन, ब्लॅक पैन्थर या सुपरहिरोजवर... अवेंजर्समध्ये अनेक एंटरटेनिंग टर्न एंड टि्वस्ट्स आहेत.. प्रत्येक सुपरहिरोची आपली वेगळी गोष्ट आहे.. या सिनेमातील युएसपी म्हणजे यातले एक्शन सीन्स, लोकेश्न्स आणि विएफएक्स.. सिनेमातील पटकथा सिनेमाला शेवटपर्यंत तितक्याच प्रभावीपणे सादर करण्यात मदत करते.. आयमॅक्स थ्रीमध्ये सिनेमा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. या सिनेमाचा पुढचा भाग मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे..बच्चेकंपनीसाठी हा चित्रपट एक जबरदस्त ट्रीट आहे..
हा चित्रपट वीकेंडपर्यंत १०० कोटी क्लबमध्ये दाखल झालाये. या चित्रपटात पहिल्यांदाच १९ सुपरहिरोज एकत्र आल्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळेच बागी २ आणि कंगनाच्या मणिकर्णिका या चित्रपटाने आपली रिलीज डेटही बदलली होती... तसेच दुसरा कुठलाही मोठा सिनेमा या सिनेमाच्या अपोझिट प्रदर्शित झाला नव्हता... हा सिनेमा २०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.