Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नात सुनिल शेट्टीच्या फिटनेसची चर्चा! जावयालाही लाजवेल अशा बॉडीचं रहस्य 'हा' एक पदार्थ

Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नामधील सुनिल शेट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून यामध्येही त्याचा लूक आणि फिटनेससंदर्भातील प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

Updated: Jan 24, 2023, 09:02 PM IST
Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नात सुनिल शेट्टीच्या फिटनेसची चर्चा! जावयालाही लाजवेल अशा बॉडीचं रहस्य 'हा' एक पदार्थ title=
Suniel Shetty Fitness (photo courtesy instagram)

Athiya Father Suniel Shetty Fitness: टीम इंडियाचा सालामीवीर आणि विकेटकीपर के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोमवारी (23 जानेवारी 2023 रोजी) लग्न बंधनात अडकले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव होत असतानाच अभिनेता सुनिल शेट्टीचा लूकही चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी तर सुनिल शेट्टी हा लूक्स आणि फिटनेसबाबतीत जावई के एल राहुलपेक्षाही सरस वाटतोय असं म्हटलं आहे. राहुल अथियाच्या लग्नाच्या निमित्ताने सुनिल शेट्टीचा फिटनेस आणि आहार पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणजेच मोठा भाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुनिल शेट्टीच्या या फिटनेसचं रहस्य फार साधी गोष्ट आहे जी तुमच्या आणि आमच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे.

सुनिल शेट्टीच्या दिवसाची सुरुवात होते 'या' पदार्थाने

सुनिल शेट्टी 61 वर्षांचा असून इन्स्टाग्रामवर तो प्रचंड सक्रीय आहे. अनेकदा तो व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. आपल्या मेहनतीबरोबरच सुनिल शेट्टीचा डाएट आणि त्यामधील एक महत्त्वाचा पदार्थ वयाची एकसष्टी ओलांडल्यानंतरही फिट राहण्यास मदत करतो. तुम्हाला नक्कीच वाचून आश्चर्य वाटेल पण सुनिल शेट्टी त्याच्या दिवसाची सुरुवात ही भात खाऊन करतो. रोज पहाटे पाच वाजल्यापासून सुनिल शेट्टी व्यायाम करतो. रोज जवळजवळ दोन तास तो व्यायाम करतो.

रोज दोन तास व्यायाम

आपल्या मॉर्निंग एक्सरसाइजची सुरुवात तो योग अभ्यास, प्राणायाम यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून करतो. त्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊन तो तब्बल 45 मिनिटं जिममध्ये असतो. न थकता आणि न थांबता तो आपल्या पिळदार शरिरयष्टीसाठी रोज पाऊण तास घाम गाळतो. मात्र सध्या जिममध्ये घाम गाळणाऱ्या सुनिल शेट्टीला आधी जिम वगैरे फारचं आवडायचं नाही. तो जिमला जायला कंटाळा करायचा. याबद्दलचा खुलासा त्यानेच केला होता.

मार्शल आर्ट्समध्येही पारंगत

एका मुलाखतीमध्ये सुनिल शेट्टीने पुलअप्स, पुशअप्स, सूर्यनमस्कार, दंड बैठकांसारखे व्यायाम करण्यास आपलं प्राधान्य होतं. मात्र नंतर आपण वाढत्या वयानुसार व्यायामाला प्राधान्य दिलं, असं सुनिल शेट्टीने स्पष्ट होतं होतं. सुनिल शेट्टी मार्शल आर्ट्समध्येही पारंगत आहे.