Actress got Married at the age of 66 for the second time : पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री बुशरा अंसारी या अनेक मालिका आणि शोमध्ये दिसल्या. या अभिनेत्रीनं 60 च्या दशकात एक बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. आता बुशरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बुशरा अंसारी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपासून त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्यात. त्यात आता त्यांचं दुसरं लग्न... आता यासगळ्यात अभिनेत्रीनं स्वत: खुलासा केला आहे.
बुशरा अंसारी त्यांच्या अभिनयासोबतच रोज व्लॉग देखील करत असतात. नुकत्याच त्यांच्या एका व्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला आणि त्यांच्या नवऱ्याशी चाहत्यांना ओळख करुन दिली आहे. बुशरा यांचा नवरा दुसरा कोणी नसून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक इकबाल हुसैन आहे. या दोघांनी व्लॉगच्या मदतीनं प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
या व्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं की एका नाटकात काम करताना त्या दोघांचं नातं खूप चांगलं झालं. त्यानंतर इकबाल यांनी बुशराला प्रपोज केलं. इतकंच नाही तर बुशरा यांनी होकार देण्यासाठी खूप वेळ घेतल्याचे देखील यावेळी सांगितलं. खरंतर त्यांनी सांगितलं की बुशरा यांच्या आई-वडिलांना इकबाल खूप आवडले होते. तर बुशरा यांनी पहिल्या लग्नाचा संसार हा जवळपास 30 वर्ष केला. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर बुशरा या त्यांच्या खासगी थोडक्यात इंडिपेन्डट आयुष्यावर लक्ष केंद्रित करु लागल्या.
वयानं मोठ्या असलेल्या महिलीशी लग्न करण्यावर इकबाल यांनी सांगितलं की त्यांच्या समाजात मोठ्या वयाच्यी महिलेशी होती त्यावरून खूप गोष्टी होत्या. तर आमच्या इथे तर वयात काही तासाचं अंतर असलं तरी खूप जास्त चर्चा होते. यानंतर इकबाल म्हणाले, बुशरा आणि त्यांच्या वयात काही तासांचा फरक आहे. हे ऐकल्यानंतर म्हणाल्या की मला असं काही वाटत नाही की आपल्यात काही तासांचा फरक आहे कारण तुम्ही मच्युए आहात आणि तुमच्यात ती स्थिरता आहे.
हेही वाचा : नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री
बुशरा अंसारी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या आंगन टेढा, रंग तरंग, फिफ्टी-फिफ्टी सारख्या लोकप्रिय पाकिस्तानी मालिकांमध्ये दिसल्या. तर त्यांचं पहिलं लग्न हे इकबाल अंसारीशी झालं होतं.