प्रभासची कृती पोलिसांना खटकताच अशी ताकीद दिली की....

पाहा असं झालं तरी काय.... 

Updated: Jul 10, 2020, 05:25 PM IST
प्रभासची कृती पोलिसांना खटकताच अशी ताकीद दिली की....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बऱ्याच महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरसची सर्वांच्याच मनात एक दहशत निर्माण झाली आहे. अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या कोरोना व्हायरस पासून बचावासाठी म्हणून सर्वच स्तरांतून सावधगिरीचा इशारा आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याला आणि त्यांचं पालन करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासन, आरोग्य यंत्रणा आणि अगदी पोलीस यंत्रणासुद्धा यात अधिक सत्कीचं वर्तन करताना दिसत आहेत. सेलिब्रिटी मंडळींनासुद्धा यामध्ये ताकिद दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.  

अभिनेता प्रभास याला नुकतीच पोलिसांकडून मिळालेली ताकीद पाहता याची प्रचिती येत आहे. जेथे थेट पोलिसांनी ट्विट करत आपण प्रभासशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तसं होऊ न शकल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला हा संदेश देत प्रकरणावर प्रकाश टाकला. प्रभाससोबतच एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी ताकिद दिली. 

प्रभासचं असं थेट पोलिसांच्या निशाण्यावर येण्यास नेमकं कारण काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना? त्याचं झालं असं की, दाक्षिणात्य चित्रपट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या प्रभासनं त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 'राधेश्याम' या चित्रपटाच्या पोस्टवर प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे झळकत असल्याचं पाहायला मिळालं. पोस्टर प्रदर्शित होताच त्याला अनेकांनी दादही दिली. पण, कोविड 19 चा वाढता संसर्ग पाहता त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं न गेल्यामुळं आसाम पोलिसांनी या अभिनेत्याला निशाण्यावर घेतलं. 

 

नागाव पोलिलांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचा पोस्टर पुन्हा एकदा पोस्ट करण्यात आला. पण, यावेळी मात्र पोलिसांनी फोटोशॉपचा वापर करत पोस्टरवर दिसणाऱ्या दोन्ही सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांवर मास्क लावलेले दाखवले. 'आमचे परफेक्ट राधेश्याम', असं लिहित त्यांनी हा फोटो पोस्ट केला. अतिशय अनोख्या मार्गानं प्रतिबंधात्मक उपायांचाअवलंब करण्यासाठी म्हणून पोलिसांनी आजमावलेला हा अफलातून मार्ग सध्या अनेकांच्याच चेहऱ्य़ावर हसू आणत आहे.