निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट

 सिद्धार्थ शुक्ला त्याच्या निधनाआधी आला होता Asim Riaz च्या स्वप्नात... आसिमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. या सगळ्यासोबतच आसिमनं हा खुलासा केला की सिद्धार्थला शोमध्ये जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केली आणि त्यांनी या आधी असं कधी केलं नव्हतं. 

Updated: Feb 28, 2023, 12:53 PM IST
निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट title=

Asim Riaz says Sidharth Shukla came in his dream before passed away : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस' मुळे अनेकांना फेम मिळालं. यापैकी सगळ्यात गाजलेलं पर्व म्हणजे 'बिग बॉस 13'. या सीझनमध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) देखील होता आणि त्याच्यासोबत या शोमध्ये अभिनेता आसिम रियाज (Asim Riaz) देखील होता. त्या दोघांमध्ये नेहमी होणाऱ्या छोट्या छोट्या भांडणांमुळे हा सीझन चांगलाच चर्चेत राहिला. मात्र, आता आसिमनं खुलासा केला आहे की सिद्धार्थ त्याच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्याच्या स्वप्नात आला होता. त्यावेळी त्यानं असं काही सांगितलं की त्यानं आसिमला शॉक बसला होता. 

आसिमनं एका मुलाखतीत खुलासा केला की "तो माझ्या स्वप्नात आला होता. माझ्या आईची शपथ... मला हे माहित होतं तेव्हाच माझ्या काकाच्या मुलानं मला फोन केला आणि हे सत्य आहे का तपासून पाहायला सांगितलं. त्यानं मला सांगितलं नाही कारण त्याला माहित होतं की मी लगेच भावूक होतो. त्या घरात मी त्याच्यासोबत इतके दिवस होतो. कुठे तरी मी त्याला कनेक्टेड होतो. त्या घराच्या बाहेर माझा कोणी मित्र नव्हतं आणि कोणासोबत माझं तसं बॉन्डही नव्हतं. आम्ही चार दिवस भांडायचो आणि चार दिवस हसायचो." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सविस्तर सांगत आसिम म्हणाला, "तो माझ्या स्वप्नात आला होता. जेव्हा सिद्धार्थनं त्याची संपूर्ण फुटेज पाहिली होती तेव्हा त्यानं मला मिठी मारली होती... त्यानं असं केलं होतं. सिडनं निळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं आणि तो त्याचे केस नीट करत होता. अल्लाह शपथ, आणि हे स्वप्न पाहिल्यानंतर मी लगेच उठलो. सिद्धार्थच्या निधनानंतर माझ्या काकाच्या 26 वर्षांच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर माझ्या एका मित्राचे निधन झाले. सिद्धार्थनंतर मी माझ्या आयुष्यातील चार लोकांना गमावले. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझी अशी परिस्थिती होती की मी काय करतोय मला कळत नव्हतं. जर मला काही झालं तर काय होईल? असे प्रश्न मला येऊ लागले होते." 

हेही वाचा : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणं लकी की अनलकी? Onkar Bhojane म्हणाला...

पुढे आसिम सिद्धार्थला शोचा विजेता कशाप्रकारे बनवले याविषयी देखील बोलला. त्याचे म्हणणे होते की सिद्धार्थला जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी असं केलं. या आधी त्यांनी असं कधीच केलं होतं. निर्मात्यांनी 20 मिनिटांसाठी त्यांची वोटिंग लाइन सुरु केली आणि प्रेक्षकांना त्यांना वोट करण्यास सांगितले.