मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor)यांच्या चार वर्षांच्या नात्याला तडा गेल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी होती. अनेकांचा तर यावर विश्वासच बसला नाही. विश्वास न बसणाऱ्यांच्या यादीत खुद्द अर्जुन कपूरचाही समावेश होता.
मलायकाचं आणि आपलं नातं तुटल्याच्या चर्चा जोर धरत असल्याचं पाहून अर्जुननं लगेलल सोशल मीडियावर धाव घेतली.
असं म्हटलं गेलं की ब्रेकअपनंतर मलायका एकटी पडली आहे, तिनं सध्या स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे.
अर्जुनही तिला भेटण्यासाठी गेलेला नाही, वगैरे वगैरे. पण, नेमकं सत्य काय हे अर्जुननंच सर्वांसमोर आणलं.
ब्रेकअपच्या चर्चावजा अफवांवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबतच सूचक कॅप्शनही लिहिलं.
लेडी लव्ह मलायकासोबतचा फोटो अर्जुननं शेअर केला. ब्लॅक अँड व्हाईट असाच हा 'मिरर सेल्फी' शेअर करत त्यानं प्रथम चर्चांना पूर्णविराम दिला.
'या विचित्र चर्चा, अफवांसाठी जागात नाहीये... सुरक्षित राहा, तुमच्यावर कृपा राहो. इतरांना सदिच्छा द्या... तुम्हा सर्वांना खूप प्रेम', असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं.
अर्जुननं ही पोस्ट करताच लगेचच चाहत्यांनी त्यावर कमेंट करत त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली.
थोडक्यात काय, तर अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप झालेला नाही. तर, ही जोडी एकमेकांची पावलोपावली साथ देत आहे हेच खरं.