मुंबई : अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी दोन्ही कलाकार बॉलिवूडचे सर्वात चर्चेत असणाऱ्या कलाकारापैकी एक आहेत. दोघांनाही बॉलिवूडमध्ये जवळ-जवळ तीन दशक झाली आहेत. मात्र दोघांनीही कधीच एकत्र सिनेमात काम केलं नाही. मात्र असं नाही की, या दोघांना तशी संधीही नाही मिळाली. मात्र या निर्णयामागे त्यांचं कोल्ड वॉर आहे. अखेर काय आहे अक्षय कुमार आणि राणी एकमेकांसोबत सिनेमात काम न करण्यामागचं कारण? चला तर मग जाणून घेवूया यामागचं कारण.
राणी मुखर्जी आणि अक्षय कुमारमधील वाद जाणून घेण्यासाठी काही वर्ष मागे जावूयात. अक्षयने ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तर दुसरीकडे राणी बंगाली सिनेमात आपल्या कामासाठी ओळखली जाते. राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी 'खिलाड़ियों का खिलाड़ी' सिनेमाची ऑफर देण्यात आली. मात्र ती अक्षयसारख्या न्यूकमरसोबत काम करण्यास अजिबात ईच्छूक नव्हची. यासाठी तिने ही ऑफर नाकारली. यानंतर हा सिनेमा रवीना टंडनला ऑफर करण्यात आली. हा सिनेमा सुपरहिट ठरला.
इतकंच नाही तर, हा वाद इथेच थांबला नाही तर 1999 मध्ये आलेला संघर्ष सिनेमासाठी निर्मात्यांनी राणी मुर्खर्जीला ऑफर दिली होती. याचबरोबर या सिनेमासाठी अक्षयला साईन करण्यात आलं होतं, मात्र जेव्हा अभिनेत्याने राणीचं नाव ऐकताच हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि म्हणूनच यानंतर या सिनेमाची ऑफर प्रिती झिंटाला देण्यात आली.
आवारा पागल दीवाना सिनेमासाठी राणीला नकारलं होतं
2002 मध्ये राणीची आवारा पागल दीवानासाठी निवड करण्यात आली होती. मात्र तिने ती ऑफरही ठोकारली. अक्षयने तिच्यासोबत एकदा नव्हेतर तीनवेळा कामाची संधी नाकारली होती. यानंतर त्याने राणीसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राणीचं करिअर फ्लॉपकडे वाटचाल करत होतं आणि अडचणीत ये होतं. यानंतर तिचे तीनही चित्रपट सलग फ्लॉप झाले होते. लगा चुनरी में दाग', 'ता रा राम पाम', 'थोडा प्यार थोरा मॅजिक' फ्लॉप झाले. पत्नीचं करिअर वाचवण्यासाठी पुढे आलेला आदित्य चोप्राने एका चित्रपटाची योजना आखली आणि या सिनेमात त्याने हिरोसाठी अक्षयची निवड केली.
मात्र पुढे जेव्हा अक्षयने ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याला स्क्रिप्टही खूप आवडली होती. मात्र जेव्हा तिला समजलं की, राणी या सिनेमा मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तेव्हा त्याने या सिनेमासाठी पुन्हा एकदा नकार दिला. यानंतर त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही. इतक्या वर्षानंतरही दोन्ही स्टार्सचं हे कोल्ड वॉर संपल नाही.