मलायकापेक्षाही हॉट आहे अरबाझची गर्लफ्रेंड, सोशल मीडियावरील रेड बिकनीतले फोटो पाहिलेत का?

या फोटोमुळे तिने चक्क अरबाझच्या पाहिल्या बायकोला मलायकालाही मागे सोडले आहे. 

Updated: Jul 25, 2022, 06:51 PM IST
मलायकापेक्षाही हॉट आहे अरबाझची गर्लफ्रेंड, सोशल मीडियावरील रेड बिकनीतले फोटो पाहिलेत का? title=

arbaaz khan girlfriend bikinishoot: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अंदरानी हिने तिच्या इन्टाग्राम पेजवरून नुकतेच बिकीनी फोटो शूट केले आहे. तिच्या या फोटोंची भलतीच चर्चा आहे. इटली येथील पेनेसुएला या ठिकाणी तिने बीचवर आपले हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटो पाहून अरबाझ तसेच जॉर्जियाचे चाहते घायाळ झाले आहेत. समुद्रकिनारी बीचवर एका दगडावर उभी राहत जॉर्जियाने हे हॉट फोटोशूट केले आहे. ती रेड बिकीनीमध्ये खूप जास्त हॉट दिसत असून तिचा बोल्डनेस पाहून मलायकाचेही चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोमुळे तिने चक्क अरबाझच्या पाहिल्या बायकोला मलायकालाही मागे सोडले आहे. 

अरबाज गेली दोन वर्षे जॉर्जियाला डेट करतो आहे. त्याच्या अफेअर्सच्या सतत चर्चा होत असतात. त्यामुळे ते दोघंही सतत स्पॉटलाईटमध्ये राहतात. अनेकदा ते दोघं बॉलीवूड पार्टीमध्ये नाहीतर कुठल्याही वेगळ्या फंगशनला एकत्र दिसतात. मध्यतंरी त्या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा सुरू होत्या परंतु त्याकडे त्या दोघांनीही फारसे लक्ष दिले नाही. 

जॉर्जिया नुकतीच इटलीला जाऊन आली. तिथे सर्वात महागड्या ठिकाणी तिने हॉट फोटोशूट केले. ती तिच्या इन्टाग्राम पेजवरून असेच हॉट फोटोज समाजमाध्यमांवर टाकत असते. तिच्या या फोटोंवर चाहतेच काय तर अरबाझही फिदा असतो. अरबाझ खान आणि जॉर्जियामध्ये तब्बल 22 वर्षांचे अंतर आहे. रिलेशनशिपमधल्या या अंतरामुळे ते दोघं अनेकदा ट्रोलही झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाझ खान आणि मलायका अरोरा यांचा काही वर्षांपुर्वी घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे जो कॉलेजमध्ये शिकतो आहे. सध्या मलायका अरोरा ही अभिनेता अर्जून कपूरला डेट करत असून अरबाझ हा जॉर्जिया अंदरानी हिला डेट करतो आहे.