अपारशक्ती खुराना ते आदित्य रॉय कपूरने फॉलो केला बार्बी ट्रेंड

एक काळ असा होता जेव्हा भारतात प्रत्येक घरात किमान एक बार्बी डॉल असणे खूप सामान्य होतं. तुम्ही बार्बी डॉलसोबत खेळलेच असाल आणि आता बार्बी मूव्ही येण्याआधी आणि आल्यानंतर बार्बीकोड फिव्हर चालू आहे. प्रत्येकजण गुलाबी रंगाचा ड्रेस घालून सोशल मीडियावर दररोज त्यांचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे.

Updated: Aug 6, 2023, 08:30 PM IST
अपारशक्ती खुराना ते आदित्य रॉय कपूरने फॉलो केला बार्बी ट्रेंड title=

मुंबई : बार्बीकोड ट्रेंडने फॅशन जगात एक अनोखा ट्रेंड सुरू झाला आहे. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी ही पिंक फॅशन अनोख्या रित्या कॅरी केली आहे. सध्या बार्बी ट्रेंण्डने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. मग यामध्ये आपले अभिनेते कसे मागे असतील. नुकताच आपल्या बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी हा ट्रेंण्ड फॉलो केला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

रणवीर सिंग:
रणवीर सिंग हा फॅशन आयकॉन आहे यात शंका नाही. रणवीर त्याच्या बोल्ड आणि अनोख्या फॅशन चॉईससाठी ओळखला जातो. निळ्या टी-शर्टवर गुलाबी मल्टी-पॉकेटेड सैल जॅकेटमध्ये तो जबरदस्त दिसतोय.

अपारशक्ती खुराना:
इव्हेंट असो किंवा कॅज्युअल डे आऊट अपारशक्ती खुराना त्याच्या फॅशन चॉईस मध्ये कधीच मागे नसतो. बेज ट्राउझर्सवर गुलाबी पुलओव्हर परिधान करून अपारशक्ती कमाल दिसतोय. अपारशक्ती खुराना ज्युबिलीचे लेखक अतुल सबरवाल यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या स्त्री 2 मध्ये दिसणार आहे.

वरुण धवन:
वरुण धवन हा एक अष्टपैलू अभिनेता आहे ज्याला केवळ त्याच्या भूमिकांमध्येच प्रयोग करणे आवडत नाही तर फॅशनमध्ये देखील तितकाच प्रयोगशाली आहे. बदलापूरचा हा अभिनेता अनेकदा गुलाबी रंगाची फॅशन करताना दिसला. गुलाबी स्वेटशर्ट आणि ट्रॅकपॅंट परिधान केलेला हा अभिनेता सुपर कूल दिसतोय.

आदित्य रॉय कपूर:
आदित्य रॉय कपूर हा नेहमीच फॅशन आयकॉन म्हणून ओळखला जातो. पिंक टी-शर्टसोबतच त्याने पिंक जीन्स घालून साधा लूक छान कॅरी केला आहे.

कसा सुरु झाला बार्बी ट्रेंड 
एक काळ असा होता जेव्हा भारतात प्रत्येक घरात किमान एक बार्बी डॉल असणे खूप सामान्य होतं. तुम्ही बार्बी डॉलसोबत खेळलेच असाल आणि आता बार्बी मूव्ही येण्याआधी आणि आल्यानंतर बार्बीकोड फिव्हर चालू आहे. प्रत्येकजण गुलाबी रंगाचा ड्रेस घालून सोशल मीडियावर दररोज त्यांचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे, हा चित्रपट सर्वत्र दिसावा यासाठी बार्बीच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले.

या प्रयत्नांतर्गत ग्रेटा गेरविग आणि तिच्या टीमने एक मोठे पाऊल उचललं आणि गुलाबी रंगाची थीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये दाखवलेली पहिली बार्बी बाहुली झेब्रा-प्रिंट वन-पीस स्विमसूट परिधान करून सोनेरी आणि तपकिरी आवृत्तीत सादर केली गेली. याशिवाय बार्बीला पांढरा सनग्लासेसही घालण्यात आला होता.