Condom विकत घ्यायला गेला अपारशक्ती, पुढे जे घडलं ते धक्कादायक

अपारशक्तीच्या या कृतीची होतेय चर्चा 

Updated: Aug 19, 2021, 11:00 AM IST
Condom विकत घ्यायला गेला अपारशक्ती, पुढे जे घडलं ते धक्कादायक  title=

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये येणाऱ्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. अगदी गावा-खेड्यातील टॅब्यू ठरलेला विषय निवडून त्यावर सिनेमाची सुंदर कथा मांडली जाते. खासकरून लैंगिक विषयावर सिनेमे तयार केले जात आहेत. 

असाच एक सिनेमा घेऊन अभिनेता अपारशक्ती खुराना घेऊन येत आहे. छोट्या शहरात कंडोम खरेदी करणं हे किती भयानक असतं हे 'हेल्मेट' या सिनेमातून मांडल आहे. या सिनेमातून या विषयावर व्यंगात्मक टिप्पणी केली आहे. हा सिनेमा झी 5 वर रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेल बुधवारी रिलीज झाला. 

या सिनेमात अपारशक्तीसोबत प्रनूतन बहल लीड रोलमध्ये आहे. प्रनूतनचा हा दुसरा सिनेमा आहे. अपारशक्तीच्या भूमिकेचं नाव लकी असून प्रनूतनचं नाव रुपाली आहे. दोघं खेड्यातील जोडपं असल्याच सिनेमात दाखवलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता अपशक्ती खुराना (Bollywood Actor Aparshakti Khurana) याच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अपारशक्ती लवकरच ‘बाबा’ बनणार आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन होईल. अपारशक्ती त्यांच्या बाळाबद्दल खूप उत्सुक आहे. 2014मध्ये अपारशक्ती खुरानाने त्याची मैत्रीण आकृती आहुजा हिच्याशी लग्न केले होते (Bollywood Actor Aparshakti Khurana and aakriti ahuja expecting first child).

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AakritiAhuja (@aakritiahuja)

अपारशक्तीच्या बाळाचे आगमन झाल्यानंतर आयुष्मान खुराना ‘बडे पापा’ (मोठा काका) होणार आहे. बाळाच्या चाहुलीसाठी संपूर्ण खुराणा कुटुंब खूप उत्सुक आहे. लहान भाऊ किंवा बहीण येणार असल्याने आयुष्मानची मुलेही खूप खुश आहेत.