अनुष्काच्या मोबाईलमध्ये Virat Kohli चे खास फोटो; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...

विराटचे 'ते' खासगी फोटो शेअर करत Anushka Sharma ने दिला पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा  

Updated: Nov 5, 2022, 11:36 AM IST
अनुष्काच्या मोबाईलमध्ये Virat Kohli चे खास फोटो; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...  title=

Happy Birthday Virat Kohli : बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाचं खास कनेक्शन आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव क्रिकेटपटूंसोबत जोडण्यात आलं. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि स्टार भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli). अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्काला वामिका नावाची एक मुलगी देखील आहे. आज विराटचा वाढदिवस आहे, प्रत्येक जण विराटला शुभेच्छा देत आहेत. अशात अनुष्का कशी मागे राहू शकते. (happy birthday virat kohli)

अनुष्काच्या मोबाईलमधील विराटचे फोटो
अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराटचे काही फोटो शेअर केले आहे. अनुष्काने विराटचे जे फोटो शेअर केले आहेत, ते तुम्ही कधीही पाहिले नसतील. फोटोमध्ये विराट एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. सध्या अनुष्काने विराटसाठी केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (virat kohli private photo)

अनुष्काने दिल्या विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा
विराटचे फोटो पोस्ट करत अनुष्काने कॅप्शनमध्ये, 'तुझा वाढदिवस आहे माय लव्ह... तर जाहीर आहे, मी ही पोस्ट करण्यासाठी तुझा सर्वात चांगला ऍगल आणि फोटोंची निवड केली.' असं लिहिलं आहे. अनुष्काच्या पोस्टवर सेलिब्रिटींनीच नाही तर, खुद्द विराटने देखील कमेंट केली आहे.  (happy birthday virat kohli 4k status)
 
विराट - अनुष्काचं लग्न 
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर, अनुष्का आणि विराटने 2017 मध्ये इटलीमध्ये एका इंटिमेट सेरेमनीमध्ये लग्न केले. तेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. 

विराट - अनुष्काला  एक लाडकी मुलगी वामिका (vamika kohli) आहे. अनुष्का सध्या तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. असे असूनही दोघेही नेहमी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून एकमेकांसाठी वेळ काढतात.