'व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय?' बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलीचा आईला सवाल

आलियानं आपल्या आईला डेटिंगचे योग्य वय काय आहे? असा प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर तिच्या आईने सुंदर अंदाजात दिलं.

Updated: Jun 24, 2021, 10:41 PM IST
'व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय?' बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलीचा आईला सवाल  title=

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीये. नुकताच फादर्स डेच्या निमित्ताने आलियाने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने वडील अनुराग कश्यपला सेक्स, रिलेशनशिप आणि प्रेग्नेन्सी या विषयांवर प्रश्न विचारले होते. 

ज्याची अनुरागने देखील बिनधास्त उत्तरं दिली. पण याआधी आलियाने तिची आई आरती बजाजलाही अशाप्रकारचे प्रश्न विचारले होते. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आलियाने तिच्या आईला काही असे प्रश्न या व्हिडीओमध्ये विचारले होते. जे शक्यतो मुले आपल्या आईला विचारणं टाळतात. पण आलियाचं तिच्या आईसोबत खूप चांगलं बॉन्डिंग असल्याने तिने मनमोकळ्या पद्धतीने आईसोबत या व्हिडिओत गप्पा मारल्या आहेत.

आलियानं आपल्या आईला डेटिंगचे योग्य वय काय आहे? असा प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर तिच्या आईने सुंदर अंदाजात दिलं, 'कधीच नाही.' त्यानंतर ती म्हणाली, 'कमीत कमी तुम्ही १८ वर्षांचे असायला हवे. त्याआधी डेटिंग करणं योग्य नाही.' याच उत्तरावर आलियानं आपण १८ व्या वर्षापासूनच डेट करायला सुरुवात केली असल्याचे उत्तर दिलं.

आलियानं अनुरागप्रमाणे आरतीलाही हा प्रश्न विचारला होता की, 'जर समजा चुकून मी कधी प्रेग्नन्ट झाले तर आई म्हणून तुझी प्रतिक्रिया काय असेल?'

 यावर उत्तर देताना आरती म्हणाली, 'असं तू कधीच करायला नको कारण बाळाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी असते. सर्वात आधी तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. स्वावलंबी व्हायला हवं. माझ्या मते तुम्ही ३० वर्षांचे होण्याआधी बाळाला जन्म द्यायला नको.'