डोळ्यात अश्रू आणि घट्ट मिठी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचं चक्क तीस वर्षांनंतर रक्षाबंधन, फोटो व्हायरल

रुपाली गांगुली यांचा एक भाऊ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांना तब्बल तीस वर्षांनंतर भेटला आहे.

Updated: Aug 10, 2022, 10:59 PM IST
डोळ्यात अश्रू आणि घट्ट मिठी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचं चक्क तीस वर्षांनंतर रक्षाबंधन, फोटो व्हायरल title=

Akshay Kumar and Rupali Ganguly: सध्या 'अनुपमा' या मालिकेत अनुपमाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली गांगूलींनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अनुपमाच्या व्यक्तिरेखेमुळे रूपाली गांगूली या अधिक चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे त्या वैयक्तिक आयुष्यातही कशा आहेत याचीही अनेकांना उत्सुकता असते. 

रुपाली गांगुली यांचा एक भाऊ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांना तब्बल तीस वर्षांनंतर भेटला आहे.  रुपाली अक्षय कुमारला राखी बांधताना दिसल्या आहेत, तूम्हालाही प्रश्न पडला असेल की त्या अक्षय कुमारला का राखी बांधत आहेत तर एका रिएलिटी शोच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रूपाली गांगुली एकाच मंचावर आले आहेत. 

सध्या अक्षय कुमार हा आपल्या 'रक्षाबंधन' या चित्रपटाचे प्रमोशन करतो आहे. उद्याच त्याचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट रिलिज होणार आहे. तेव्हा त्यानिमित्ताने हे दोघं जरी रक्षाबंधन साजरी करता दिसले असले तरी त्या दोघांचेही नाते खूप जूने आहे. त्यांची मैत्री ही 1992 पासून आहे. रुपाली गांगुली आणि अक्षय कुमार यांचे जुने भावा-बहिणीचे नाते आहे

'Sunday with Star Parivar' या रिएलिटी शोमधून त्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाली तीही तब्बल तीस वर्षांनंतर. यादरम्यान अक्षय कुमारसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना रूपाली गांगुली यांनी आठवणींना उजाळा दिला.

रुपाली गांगुली यांनी अक्षय कुमारसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले, “अक्षय आमच्यासाठी कुटुंबाचा एक भाग आहे. माझ्या वडिलांनी त्याला त्याच्या सुरुवातीच्या काळात साइन केले होते. आम्ही त्याला तेव्हापासून ओळखतो. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा स्वभाव पाहून आम्हाला खूप छान वाटले. अक्षय वक्तशीर, मेहनती आणि अतिशय सरळ आहे. जेव्हा आम्ही पप्पांच्या चित्रपटासाठी बाहेर जायचो तेव्हा अक्षय पहाटे ४ वाजता उठून व्यायाम करायचा. माझ्या वडिलांना त्याचा खूप अभिमान वाटायचा आणि त्याला पाहून खूप आनंदही व्हायचा. त्यामुळे माझ्या वडिलांमुळे अक्षय कुमारशी माझे नाते अधिक घट्च झाले.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आठवड्याच्या बॉलिवूड स्पेशल एपिसोडमध्ये 'Sunday With Star Parivaar' मधून 'खिलाडी नंबर 1' अक्षय कुमारच्या उपस्थितीत राहणार आहे.