अनुपम खेर यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांच्या चित्रपटांची चाहते वाट पाहत असतात.

Updated: Jul 5, 2022, 08:13 PM IST
अनुपम खेर यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांच्या चित्रपटांची चाहते वाट पाहत असतात. अनुपम खेर विनोदी किंवा खलनायकाच्या भूमिकेत नेहमी आपल्याला दिसतात. आणि  ते पात्र चोख निभवतात. नुकतीच त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.

अनुपम खेर लखनऊमध्ये त्यांच्या आगामी 'कागज 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच चित्रपटाच्या सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर अभिनेते अनुपम खेर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. एका रिपोर्टनुसार, जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी अभिनेता कोर्टरूमच्या सीनचं शूटिंग करत होता.  अनुपम खेर शूटिंगदरम्यान सेटवर इकडे तिकडे फिरत होते. तेव्हा अचानक त्यांचं डोकं कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी स्ट्रक्चरला धडकलं.

या घटनेनंतर लगेचच, दर्शन कुमार आणि सतीश कौशिक यांच्यासह सेटवर उपस्थित असलेले सगळे लोकं अनुपम खेर यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की ते ठीक आहेत की नाही. या घटनेनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं शुटिंग पुढे ढकललं पण अनुपम खेर यांनी आपलं काम पूर्ण करण्याचा आग्रह धरला. अभिनेत्याने दिग्दर्शकाला थोडा वेळ देण्यास सांगितला जेणेकरुन त्यांचा त्रास कमी होईल.

प्रत्येकजण तणावग्रस्त असल्याचं पाहून, अनुपम खेर यांनी सेटवरील वातावरण हलकं करण्यासाठी त्यांच्या दुखापतीबद्दल काही विनोद केले ज्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला. दुसरीकडे, अनुपम खेर हे विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात दिसले होते. जो काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा विषय बनला होता. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता आणि तो लवकरच 'कागज 2' मध्ये दिसणार आहे.