मानुषी छिल्लरवरील वादग्रस्त ट्विटवर अनुपम खेर भडकले

कॉंग्रेसचे नेते शशी थरूर, ट्विटर पोस्ट आणि वाद हे समीकरण दिवसेंदिवस कठीण होत आहे. मोदी सरकारचे नोटाबंदीवरील अपयश ठळक करण्यासाठी शशी थरूर यांनी एक वादाग्रस्त ट्विट केले होते. 

Updated: Nov 20, 2017, 09:55 AM IST
मानुषी छिल्लरवरील वादग्रस्त ट्विटवर अनुपम खेर भडकले  title=

मुंबई : कॉंग्रेसचे नेते शशी थरूर, ट्विटर पोस्ट आणि वाद हे समीकरण दिवसेंदिवस कठीण होत आहे. मोदी सरकारचे नोटाबंदीवरील अपयश ठळक करण्यासाठी शशी थरूर यांनी एक वादाग्रस्त ट्विट केले होते. 

काय होते शशी थरूर यांचे ट्विट 

आमच्याकडे 'चिल्लर' ही मिस वर्ल्ड होते. अशा आशयाचे एक ट्विट शशी थरूर यांनी केले होते.   मात्र यानंतर वाद भडकला आहे. आता यामध्ये अनुपम खेर शशी थरुर यांच्यावर भडकले आहेत. त्यांनी ट्विट करून  'तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर कसे येऊ शकता ?' असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

शशी थरूर यांनी रविवारी वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर सामान्य नागरिकांनीदेखील यावर ट्विट  करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

ट्विटरवरील वाढता रोष बघून शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माफीदेखील मागितली आहे. 

 

'माझं ट्विट हा केवळ मस्करीचा भाग होता. त्यामध्ये मिस  वर्ल्डचा अपमान  करण्याचा कोणताही हेतू नव्हता' असे त्यांनी म्हटले आहे.