अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना कोणता शाप दिला होता? त्यांनीच केलं होतं लाँच

अनुपम खेर यांना पदार्पण करण्यासाठी खूप कठिण होतं त्यांना खूप स्ट्रगल करावा लागाला होता. अनुपम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला सिनेमा 'सारांश'मधून केली.

Updated: Mar 7, 2024, 05:13 PM IST
अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना कोणता शाप दिला होता? त्यांनीच केलं होतं लाँच title=

मुंबई : आज  ७ मार्च रोजी अभिनेते अनुपम खेर ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुपम खेर मुळचे  हिमाचल प्रदेशातील शिमला येथील.  शिमला येथे अनुपम खेर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव   पुष्कर नाथ खेर होतं.  अनुपम खेर वन विभागात लिपिक म्हणून काम करत होते. अनुपम यांची आई दुलारी देवी गृहिणी होत्या. आपण नोकरी करायची नाही आपला जन्म अभिनयासाठी झालाय याची जाणीव आधीपासूनच अनुपम खेर यांना होती. पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर, त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि त्यांनी त्यांचं करिअर अभिनयाकडे वळवलं. अनुपम यांच्यासाठी चित्रपट सुरू करणं इतकं सोपं नव्हतं.

अनुपम खेर यांना पदार्पण करण्यासाठी खूप कठिण होतं त्यांना खूप स्ट्रगल करावा लागाला होता. अनुपम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला सिनेमा 'सारांश'मधून केली. जो सिनेमा त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीती सगळ्यात भारी सिनेमाम्हणून पाहिला जातो. अभिनेत्याने एका जुन्या मुलाखतीत यासंबधित एक किस्सा ऐकवला होता. तेव्हा अनुपम केवळ २८ वर्षांचे होते. मात्र त्यांना पडद्यावर  जगण्यासाठी एक जुनी व्यक्तिरेखा मिळाली.

 अभिनयाचं वेड असल्यामुळे अनुपम यांनी या भूमिकेसाठी लगेच होकारही दिला. त्यांनी सिनेमासाठी जोरदार तयारीही सुरु केली. मात्र एक दिवस अचानक बातमी समोर आली की, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अनुपम यांच्या जागी संजीव कुमार यांची निवड केली. हे ऐकून अनुपम खेर यांना मोठा धक्का बसला. आणि संतापलेल्या अनुपम यांनी मुंबई सोडून परतण्याचा निर्णय घेतला.

आपला राग काढण्यासाठी अनुपम थेट महेश भट्ट यांच्या घरी पोहचले.
दिलेल्या मुलाखतीत अनुपम असंही म्हणाले की, ''मी केवळ मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला नाही तर महेश भट्ट यांच्याकडे संताप व्यक्त केल्यानंतरच मी निघून जाण्याचा निर्णय घेतला होता.'' असं म्हटलं जातं की, अभिनेता थेट महेश भट्ट यांच्या घरी पोहोचला आणि त्यांना अशा काही गोष्टी बोलल्या की, महेश भट्टने त्यांना मध्येच गप्प केलं.

अनुपम यांनी सांगितलं,- तुमच्या स्वतःच्या जीवनात सत्यता नाही
अनुपम यांनी महेशला सांगितलं,   तू तुझ्या या चित्रपटात खरेपणाविषयी बोलत आहेस, मात्र तुझं आयुष्यच खरं नाही.  मी ब्राह्मण आहे आणि तुला शाप देतो... असं ते म्हणत असताना महेशने त्याला अडवलं. त्याला थांबवलं. आणि मग 'सारांश'चं शूटिंग सुरू झालं. आम्ही तुम्हाला सांगतो की हा चित्रपट एका वृद्ध जोडप्याची कथा आहे ज्याने आपला एकुलता एक मुलगा गमावला आणि जगण्याची इच्छा सोडली.
 
या चित्रपटाच्या कथेत एक वळण तेव्हा येतं जेव्हा त्याला त्याच्या आयुष्यात एक नवीन उद्देश मिळतो. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तर महेश भट्ट यांना उत्कृष्ट कथेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. जेव्हा जेव्हा कलात्मक चित्रपटांची चर्चा होते तेव्हा अनुपम खेर यांच्या या चित्रपटाचे नाव अव्वल असतं.