MMS व्हायरल झाल्यानंतर Anjali Arora चा आणखी एक व्हिडिओ चर्चेत; पाहून तुम्हाला बसेल धक्का

 सोशल मीडिय सेन्सेशन बनलेली अंजली अरोरा सतत चर्चेत असते.

Updated: Aug 23, 2022, 10:03 PM IST
MMS व्हायरल झाल्यानंतर Anjali Arora चा आणखी एक व्हिडिओ चर्चेत; पाहून तुम्हाला बसेल धक्का  title=

मुंबई : सोशल मीडिय सेन्सेशन बनलेली अंजली अरोरा सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करते. जे लगेच व्हायरल होतच. तिची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. नुकतीच ती एका MMS व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. आता तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे आणि तीही तिच्या क्यूट स्टाईलमध्ये.

या लेटेस्ट व्हिडिओमध्ये अंजली तिच्या हॉट डान्स मूव्ह्सने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवताना दिसत आहे. तिचे डोळ्यांचे एक्सप्रेशन, कंबर लचकवणं, किलर स्माईलने हृदयाला घायाळ करण्याची तिची शैली... सर्व काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे.

अंजली इम्रान खान आणि सोनम कपूर यांच्या 'आय हेट लव्ह स्टोरीज' या चित्रपटातील 'बहारा' या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना ती दिसली आहे. तिने फक्त नाईट ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या व्हिडिओला नेहमीप्रमाणेच चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओला आता पर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंजली अरोराने सोशल मीडियावर रील बनवून इतकी लोकप्रियता मिळवली आहे की, फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती मोठ-मोठ्या सिने स्टार्सना टक्कर देऊ शकते. तिची लोकप्रियता पाहून तिला कंगना राणौतच्या शो 'लॉकअप'मध्ये बोलावण्यात आलं. नुकताच तिचा एक एमएमएस लीक झाला होता. मात्र, अंजलीने व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी ती नसून तिच्यासारखी दिसत असणारी मुलगी असल्याचं सांगितलं होतं. तरीही चाहते तिला या संबंधित प्रश्न विचारत आहेत.