तो आला आणि त्याने जिंकलं, विकी जैन कसा बनला अंकिताचा लाईफ पार्टनर

बराचवेळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी १४ डिसेंबरला लग्न केलं.

Updated: Dec 24, 2021, 08:31 PM IST
तो आला आणि त्याने जिंकलं, विकी जैन कसा बनला अंकिताचा लाईफ पार्टनर title=

मुंबई : बराचवेळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी १४ डिसेंबरला लग्न केलं. जेव्हा अंकिता विकीला भेटली तेव्हा ती तिच्या सगळ्यात वाईट टप्प्यात होती. सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ब्रेकअपमुळे ती खूप तूटली होती. अंकिता तिचं जीवन पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा विकी तिच्या आयुष्यात मार्गदर्शक आणि देवदूत म्हणून आला होता. मित्राप्रमाणे तिला प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली.  आणि मग कायमसाठी तिचा हात धरला.

आज आम्ही तुम्हाला नवविवाहित जोडप्याच्या क्यूट लव्हस्टोरीबद्दलही सांगणार आहोत. दोघांची पहिली भेटही खूप रंजक होती. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत बराच काळ एकत्र होते आणि त्यानंतर अचानक 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. या सगळ्याचा आरोप अंकितावर करण्यात आला. पण  दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली होती की, लोकांना वाटतं की, मी सुशांतला सोडलं, पण हे खरं नाही. हे पूर्णपणे खोटं आहे.

अंकिता लोखंडे म्हणाली, 'सुशांतने माझ्यात आणि करिअर मध्ये  करिअर निवडलं आणि तो पुढे गेला. मी त्याला हे करण्यापासून रोखलं नाही. मात्र माझ्यासाठी सगळं काही संपलं होतं. अडीच वर्षे मला काय करावं हे समजत नव्हतं. पण या काळात माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले.  त्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण पूर्ण वेळही दिला. त्यांनी सांगितलं की, या अडीच वर्षांत मी फक्त हरवलेच नाही, पण पुन्हा काम करण्याच्या स्थितीतही नव्हते. अंकिताने सांगितलं की, 'मला फक्त सुशांतची खंबीर समर्थक व्हायचं होतं. पण ब्रेकअपनंतर मला समजलं की, मीही काहीतरी आहे.'

अशी होती विकी-अंकिताची पहिली भेट
काही रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते. ब्रेकअपनंतर अंकिताने प्रवास करणं, लोकांना भेटणं, बोलणं बंद केलं होतं. पण या गोष्टींपासून स्वत:ला दूर करण्यासाठी तिने एका मित्राच्या पार्टीत एंट्री केली. याच पार्टीत विकी जैनही उपस्थित असल्याने दोघांमध्ये ठिणगी पडली. एकमेकांना आवडले आणि हळू हळू संवाद सुरू झाला.

अंकिता आणि विकी जैन यांनी 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली
त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यांच्या अफेअरची अफवाही आगीसारखी पसरली. अंकिता तिचे आणि विकीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करायची. पण तिने त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. 2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोलले जात होतं, पण दोघांनीही आपल्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेतले आणि मगच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि अशाप्रकारे अंकिता-विकी १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले.