कॅमेऱ्यासमोर अनिल कपूरच्या मुलीचं पतीसोबत लिपलॉक, फोटो व्हायरल

तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Updated: Dec 26, 2021, 06:42 PM IST
कॅमेऱ्यासमोर अनिल कपूरच्या मुलीचं पतीसोबत लिपलॉक, फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आणि निर्माती रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा पती करण बुलानीसोबतचे फोटो शेअर करत असते.

आता तिचा एक फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. फोटोमध्ये रिया पती करणवर प्रेमाचा व्यक्त करताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पतीसोबत लिपलॉक

इंस्टाग्रामवरील व्हायरल फोटोत रिया कपूर पती करणसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. रिया कपूर तिच्या कुत्र्यासोबत सोफ्यावर बसली आहे आणि करण तिला किस करताना दिसत आहे. 

Rhea Kapoor: I'm aware of the privileges of being Anil Kapoor's daughter,  but I have had only one father | Hindi Movie News - Times of India

यावर्षी जोडप्याचे लग्न झाले

रिया कपूर आणि करण बुलानी यावर्षी 14 ऑगस्टला लग्नबंधनात अडकले. दोघेही लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.

रिया कपूर आणि करणच्या लग्नात जान्हवी कपूर, खुशी कपूर, अर्जुन कपूर, अंशुल कपूर आणि महीप कपूरसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.