मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरने अलीकडेच तिच्या बॉयफ्रेंन्डसोबत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रिया तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी सोबत रोमांन्स करताना दिसत आहे. रियाने करणसोबतचा किसींग फोटो शेअर केला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोनम कपूरची बहीण रिया आणि करणच्या रिलेशनशिपला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.
रिया आणि करणनं आठवड्याच्या शेवटी एक पार्टी आयेजित केली होती. याचदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या रोमान्समध्ये मग्न असल्याचे दिसून आलं. आणि आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रिया कपूर ही अनिल कपूर यांची लहान मुलगी आहेचं, मात्र ती एक चित्रपट निर्माती देखील आहे. रिया आणि करणचं नात खूपच सुंदर आहे. हे दोघं नेहमीचं सोशल मीडियावर रोमँटिक फोटो एकमेकांसोबत शेअर करतात. लवकरचं हे लवबर्ड लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
रियाने नुकताच तिचा ३४वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमीत्ताने करणनं रियासाठी एक छान संदेश देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे...एका दिवशी मी तुला दुनियेतली सगळी सुख: तुला देवू ईश्चितो, जेवढी तु माझ्या आयुष्यात घेवून आली आहेस... अशा आशयाचा संदेश करणनं रियासाठी शेअर केला आहे.
गेली दहा वर्ष रिया आणि करण एकमेकांना डेट करत आहेत. दोघं नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. रियानं आईशा, खूबसूरत, वीर दी वेडिंग या सिनेमांची निर्मीती केली आहे. बॉलिवूडमधील फेवरेट कपल पैकी हे कपल चाहत्यांचं आवडत कपल आहे. या दोघांच्या सोशल मीडिया अकांऊन्टवरुन आपलं प्रेम कायम व्यक्त करत असतात. हे दोघं कायम आपला क्वालिटी टाईम एकमेकांसोबत घालवणं पसंत करतात.