अनिल अंबानी यांनी करन जोहर यांना दिलं होतं, एक गुप्त पत्र, त्यात होतं असं काही...

अत्यंत हुशार सिनेनिर्माता करण जोहर, निर्माता यश जोहर यांचा मुलगा आहे. यश जोहर यांनी दोस्ताना, अग्निपथसारख्यां बड्या सिनेमांची निर्मीती केली आहे.  यश जोहर यांनी त्यांचे

Updated: Mar 4, 2021, 06:08 PM IST
 अनिल अंबानी यांनी करन जोहर यांना दिलं होतं, एक गुप्त पत्र, त्यात होतं असं काही... title=

मुंबई : अत्यंत हुशार सिनेनिर्माता करण जोहर, निर्माता यश जोहर यांचा मुलगा आहे. यश जोहर यांनी दोस्ताना, अग्निपथसारख्यां बड्या सिनेमांची निर्मीती केली आहे.  यश जोहर यांनी त्यांचे मित्र-मैत्रिणी जोडले होते. ज्यामध्ये बीग बी ते अनिल अंबानी सुद्धा त्यांच्या खूप जवळचे मित्र होते. अनिल अंबानी सोबत त्यांची एवढी गट्टी होती की, यशराज यांच्या मृत्यूआधी त्यांनी अनिल अंबानी यांना एक सिक्रेट लेटर दिलं होत. एवढं मोठं सिक्रेट त्यांनी स्वत:चा मुलगा करणला देखील सांगितलं नाही.

करण जोहर यांचे वडील यश जोहर यांचं २६ जून २००४ला  निधन झालं. अनिल अंबानी यांनीच त्यांच्या अंतिम संस्काराची पूर्ण जबाबदारी देखील घेतली. त्यांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी करणला अनिल अंबानी यांचा फोन आला. यावेळी त्यांनी सागितलं की, मी तुला काही देवू ईश्चितोय, यावर करण म्हणाला ठीक आहे. मी तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येतो.

यावर अनिल अंबानी यांनी उत्तर दिलं मी स्वत: तुला भेटायला येईन, यानंतर काही वेळातच अनिल अंबानी करण जोहरला भेटायला गेले.आणि त्याच्या हातात ऐक लेटर सोपवत म्हणाले, तुझ्या वडिलांच्या निधनाआधी तुझ्या वडिलांनी मला एक लेटर दिलंय आणि सांगितलंय किमी जेव्हा या जगातून जाईन तेव्हा हे लेटर करणला दे.

करण जौहरच्या सांगण्यावरुन हे लेटर त्यांच्या बिजनेसच्या बिल संर्दभातील होतं. ज्यामध्ये कुणाला किती पैसे द्यायचे आहेत. कुणाकडून किती पैसे घ्यायचे आहेत. या संर्दभातील सगळी माहिती लिहिली होती. या व्यतिरिक्त सगळ्या बिझनेसच्या डिटेल्स या पत्रात लिहिल्या होत्या.आणि या लेटर वाचल्यानंतर त्याला वडिलांचा बिझनेस सांभाळायला सोपं पडलं.

यासंर्दभातील सगळी माहिती करणनं त्याची बायोग्राफी असलेलं पुस्तक 'सुटेबल बॉय' या पुस्तकांत सांगितली आहे. पुस्तकात त्यांनी अनिल अंबानी त्यांच्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत असंही सांगितलं.

करण जोहरच्या वडीलांनी अनिल अंबानी यांच्याकडे दिलं होतं एक सिक्रेट लेटर,करणला सुद्धा माहिती न्हवतं