'चंद्रमुखी'साठी मानसी नाईक पहिली पसंती? Amruta Khanvilkar चा खुलासा

chandramukhi या मराठी चित्रपटात अमृतानं चंद्रमुखी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. 

Updated: Feb 11, 2023, 01:31 PM IST
'चंद्रमुखी'साठी मानसी नाईक पहिली पसंती? Amruta Khanvilkar चा खुलासा title=

Amruta Khanvilkar On Manasi Naik Statement : 'चंद्रमुखी' (Chandramukhi)  हा मराठी चित्रपट आणि चित्रपटातील अभिनेत्री अमृता खानविलकरची (Amruta Khanvilkar) भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा अनेकांनी अमृताच्या अभिनयाचे कौतुक केले. त्यानंतर सगळीकडे चर्चा होती ती अभिनेत्री मानसी नाईकनं केलेल्या वक्तव्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मानसी नाईक (Manasi Naik) म्हणाली होती की तिला या चित्रपटासाठी आधी विचारणा करण्यात आली होती आणि तिच्या पेक्षा चांगली चंद्रमुखी साकारली होती. या वक्तव्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आता अमृतानं प्रतिक्रिया दिली आहे. 

अमृतानं नुकतीच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या 'पटलं तर घ्या' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमृतानं मानसी नाईकच्या या वक्तव्यावर तिची बाजू मांडली आहे. "आपल्या सृष्टीत असं नेहमीच सुरु असतं. आपण अनेकदा असं पाहिलं पण आहे. चंद्रमुखी या चित्रपटाचा विषय हा खुला होता. या चित्रपटाचे सगळे राईट्स अक्षय बर्दापूरकरनं दोन वर्षांपूर्वीच विकत घेतले होते. त्याआधी अनेकांनी विश्वास पाटील यांच्याकडे जाऊन या चित्रपटाविषयी विचारणा केली होती. माझं याबद्दल मानसीसोबत काहीही बोलणं झालेलं नाही. पण मला असं वाटतं की कोणी तरी आधी हा प्रोजेक्ट करत असेल आणि त्यानं त्यासाठी मानसीला विचारणार केली पण त्यात काहीही वेगळं असं नाही. मला सुद्धा अशा अनेक चित्रपटांविषयी विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्या चित्रपटात कोणी तरी दुसरीच अभिनेत्री दिसली होती," असं अमृता म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Aamir Khan With Stick : आमिरची 'ती' अवस्था पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न!

याविषयी बोलताना अमृता पुढे म्हणाली, "चित्रपटसृष्टीत हे नेहमीच होत असत यात काही नवीन गोष्ट नाही. यामुळे मी नेहमीच प्रियांका चोप्राचं एक वाक्य कायम लक्षात ठेवते, माझ्या आधी कोणाला विचारण्यात आलं किंवा नाही, याने मला काहीही फरक पडत नाही. मी तो चित्रपट करते हे तेव्हाच ठरतं जेव्हा मी त्या चित्रपटाच्या सेटवर जाते. मी त्या सेटवर गेले आणि ती भूमिका साकारली. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे आला होता. तेव्हा तो म्हणाला होता की मला माझी चंद्रमुखी तुझ्यात दिसते. त्यामुळे मी त्याला चित्रपटासाठी होकार दिला." चंद्रमुखी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकनं केलं आहे.