Amitabh Bachchan Gand Daughter Navya Naveli Nanda is Reacher Than Him : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी स्टारकिड्सपैकी एक आहे. नव्यानं वयाच्या 21 व्या वर्षी बिझनेसच्या जगात पदार्पण केलं. आता नव्या ही द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादशी MBA ची डिग्री घेण्यासाठी अॅडमिशन देखील घेतलं. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबाच्या संपत्तीची चर्चा सुरु असताना आता नव्याच्या एकूण संपत्तीची देखील चर्चा रंगली आहे.
नव्या ही 26 वर्षांची असून तिनं आयआयएम अहमदाबादच्या ब्लॅंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये अॅडमिश घेतलं. नव्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं स्वप्न पूर्ती झाल्याचं सांगितलं. तिनं IIM अहमदाबादचे काही फोटो शेअर केले आणि स्वप्न पूर्ण होण्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी माहिती दिली की पुढची दोन वर्ष ती सगळ्याच चांगली लोकं आणि सगळ्यात चांगल्या फॅकल्टीसोबत राहणार आहे आणि स्वप्न पूर्ण होण्याविषयी सांगितलं. त्याशिवाय पुढचे दोन वर्ष अर्थात ती 2026 इथेच राहणार असल्याचं तिनं सांगितलं.
नव्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडविषयी बोलायचे झाले तर ती अमाप संपत्तीची वारसदार आहे. नव्याचे वडील निखिल नंदा एक लीडिंग भारतीय इंजीनियरिंग ग्रुप एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे चेअरमेन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 2021 पर्यंत या कंपनीचा रेव्हेन्यू 7014 कोटी होता. तर एस्कॉर्ट्स कुबोटाच्या अॅग्रीकल्चरल मशीनरी, कंस्ट्रक्शनं आणि रेल्वे उपकरणांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. निखिल नंदा यांच्याकडे या कंपनीचे 36.59 टक्के भागीदारी आहे आणि त्यांना 13.1 कोटी वार्षिक पगार मिळतो.
नव्या वयाच्या 21 व्या वर्षी ज्युनियर मार्केटिंग मॅनेजरच्या रुपात फॅमिली बिझनेसमध्ये सहभागी झाली आणि तेव्हापासून ती या कंपनीसोबत काम करते. नव्याच्या बिझनेसविषयी बोलायचे झाले तर ती तिच्या कुटुंबाच्या देखील पुढे आहे. नव्या ही 'आरा' हेल्थची को-फाउंडर आहे. ही महिलांवर आधारीत असलेली हेल्थ टेक कंपनी आहे, जी भारतीय महिलांसाठी स्वस्तात हेल्थकेयर सल्यूशन देते. त्याशिवाय ती 'नवेली' प्रोजेक्टची देखील फाऊंडर आहे. ही एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायजेशन आहे ज्याचा उद्देश हा शिक्षा, आर्थिक स्वातंत्र्य आणि घरात होणारी हिंसेचा शिकार झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी पुढे येते.
मीडिया आणि एन्टरटेन्मेंटविषयी बोलायचे झाले तर नव्याचा लोकप्रिय पॉडकास्ट 'वॉट द हेल नव्या' आहे. तिच्या या पॉडकास्टमध्ये श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन देखील सहभागी होतात आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करताना दिसतात आणि याच कारणामुळे हा शो चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
दरम्यान, गेल्यावर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा जुहूमध्ये असलेला प्रतीक्षा बंगला हा नव्याची आई श्वेता बच्चनच्या नावी केला. या बंगल्याची किंमत 50 कोटी असल्याचं म्हटलं जातं. आता हा बंगला देखील नव्या आणि तिचा भाऊ अगस्त्य नंदाला पुढे मिळणार आहे. याशिवाय नव्याला तिच्या वडिलांच्या दिल्ली आणि इतर शहरांमध्ये असलेल्या अनेक संपत्ती या वारसानुसार मिळण्याची आशा आहे.
हेही वाचा : विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहा
नव्या नवेली जवळपास एकूण 7014 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. तर अमिताभ यांच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर 2023 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, 3,190 कोटी रुपयांची आहे आणि दरवर्षी ते तब्बल 60 कोटीं कमावतात. नव्याच्या स्वत: च्या संपत्तीविषयी बोलायचे झाले तर बिझनेस वेंचर आणि ब्रॅंड अॅन्डॉर्समेंटला मिळून तिच्याकडे एकूण 16.58 कोटी आहे.