कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'या' फोटोसह दिला मोलाचा सल्ला

वाचा त्याने नेमकं काय म्हटलं   

Updated: Mar 16, 2020, 12:48 PM IST
कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'या' फोटोसह दिला मोलाचा सल्ला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. चीनमागोमग आता अनेक राष्ट्रांमध्ये या व्हायरसचं थैमान पाहायला मिळत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय करुन व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याचा इशारा WHO कडूनही देण्यात आला आहे. पण, तरीही एका अभिनेत्याला आणि त्याच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरची लागण झाली होती. 

एक लाखांहून अधिकजणांना लागण झालेल्या या व्हायरसच्या विळख्यात आलेला हा अभिनेता म्हणजे टॉम हँक्स आणि त्याची पत्नी रिटा विल्सन. कोरोनाची लागण झाल्याचं कळताच टॉमने सोशल मीजियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. ज्यानंतर त्याच्या आणि त्याच्याच्या पत्नीविषयी चाहत्यांच्या वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात आली. 

काहींनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. चाहत्यांचं हेच प्रेम आणि योग्य वैद्यकिय उपचार, प्रतिबंधात्मक यांच्या बळावर हँक आणि त्याच्या पत्नीने कोरोनाचा लढा दिला. ज्यानंतर आता त्याने एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामाध्यमातून त्याने सर्वांनाच एक मोलाचा सल्लाही दिला आहे. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

हँकने शेअर केलेल्या या फोटोमध्ये खाण्याचे काही पदार्थ दिसत आहेत. सोबतच एक कांगारुही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन म्हणून त्याने लिहिलं, 'मदत करणाऱ्या प्रत्येकाचेच आभार. आता स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घ्या.' सध्याच्या घडीला हँक्स या आजारातून सावरत असून, मोठ्या धीराने या आजारावर मात करत असल्याचं त्याची पोस्ट पाहून लक्षात येत आहे.