रिलीजच्या दोन दिवसांपूर्वीचं Panchayat 2 लीक; 'या' साईटवरून करतायत डाऊनलोड

अ‍ॅमेझॉन प्राईमवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरीज असलेल्या पंचायतचा दूसरा सिझन येत्या 20 मे रोजी रिलीज होणार होता. या  सीरिजची चाहत्यांना उत्सूकता लागलीय. 

Updated: May 18, 2022, 09:46 PM IST
रिलीजच्या दोन दिवसांपूर्वीचं Panchayat 2 लीक; 'या' साईटवरून करतायत डाऊनलोड title=

मुंबई :

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईमवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरीज असलेल्या पंचायतचा दूसरा सिझन येत्या 20 मे रोजी रिलीज होणार होता. या  सीरिजची चाहत्यांना उत्सूकता लागलीय. त्यात आता पंचायत 2 ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अ‍ॅमेझॉन प्राइम ओरिजनल सीरिजमध्ये 'पंचायत' चा दुसरा सिझन येत्या २० रोजी रिलीज होणार होता. मात्र पंचायत 2 ऑनलाइन लीक झाल्याची माहिती आहे. 

दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेली ही वेब सीरिज लोकांना खूप आवडली होती. या कॉमेडी ड्रामामध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव आणि नीना गुप्ता यांसारखे दिग्गज कलाकार होते. आता हे कलाकार 'पंचायत २'मध्येही दिसणार आहे. दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना फुलेरा पंचायत कार्यालयात सचिव म्हणून इंजिनीअरिंग केलेला अभिषेक म्हणून दिसणार आहे.

पंचायत 2 लीकबाबत अनेक युजर्सनी ट्विटरवर ट्विटही केले आहे. अनेक युजर्सनी ट्विटवर लिहिले आहे की Amazon Prime ने आता लवकरात लवकर पंचायत 2 रिलीज करावा जेणेकरुन पायरसी टाळता येईल. पूर्वी पायरसी वेबसाइट्स फक्त चित्रपट लीक करत असत पण आता वेब सीरीज देखील रिलीजपूर्वी लीक होत आहेत.

टेलिग्रामवर नेहमीच अनेक वेबसीरीज रिलीजआधीच लीक असतात. असे आता पंचायत सीजन 2 बाबत झाले आहे. याचा निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. टेलिग्रामवर ही सीरिज लिक झाल्याने अनेकजण ती डाऊनलोड करतायत.