मुंबई : प्रेमाची अमुक अशी व्याख्याच नाही. मुळात प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यासाठी व्याख्येचीही आवश्यकता नसते. अशाच प्रेमाच्या 6 गोष्टी नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
गोष्टीही अशा, ज्यांचं मुंबईशी खास नातं. अशा या नात्यांच्या गोष्टींमध्ये अतिशय संवेदनशीलतेनं हाताळलेली कथा 'बाई' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आली.
हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात साकारलेली ही कथा अभिनेता प्रतीक गांधी आणि रणवीर ब्रार यांनी मोठ्या समर्पकतेनं सर्वांसमोर सादर केली. समलैंगिक संबंधांचं एक नातं दाखवण्याचा प्रयत्न या कथेतून करण्यात आला. (Amazon Prime Video 'Modern Love, Mumbai')
सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यानं 'बाई'च्या निमित्तानं पहिल्यांदाच अभिनयात पदार्पण केलं आहे. त्याची भूमिकाही आव्हानात्मक अशीच. हीच भूमिका, किंबहुना हे नातं जेव्हा प्रेक्षकांनी पाहिलं तेव्हा अनेकांनी हंसल मेहता यांच्याशी संपर्क साधत प्रतीक आणि रणवीर एकमेकांसोबत काहीसे संकोचल्यासारखे का वागत आहेत? असा प्रश्न केला.
अनेकांच्याच प्रश्नातं उत्तर देत मेहता यांनी चक्क आनंद व्यक्त केला, की मला समाधान आहे तुम्हाला हा संकोचलेपणा दिसला. कारण, मला तेच अपेक्षित होतं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच कोणालातरी भेटता तेव्हा तुम्हाला उत्कट भावना जाणवतात. पण, तेव्हाच तुमच्यात योग्य पद्धतीनं Kiss होतं असंही नाही.
हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. नात्याचंही तसंच असतं, त्यांना वेळ द्यावा लागतो हाच विचार त्यांनी सर्वांपुढे मांडला. लोकांना सर्वच गोष्टी जिथल्यातिथे का हव्या असतात, असा प्रश्न विचारत मंजर आणि राजवीर, अनुक्रमे (Pratik Gandhi, Ranveer Brar) यांना त्यांनी उलडगून सर्वांपुढे आणलं.
'बाई' या लघुकथेमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी मंजरच्या आजीची भूमिका साकारली आहे. कथेचं नावहं त्यांनी साकारलेल्याच पात्रावरून ठेवण्यात आलं आहे.