'पाताल लोक' चित्रकूटमध्ये चित्रित झालेली पहिली सीरीज

निर्माता सुदीप शर्मा सांगतात अनुभव 

Updated: May 16, 2020, 09:50 AM IST
'पाताल लोक' चित्रकूटमध्ये चित्रित झालेली पहिली सीरीज title=

मुंबई : अमेझॉन प्राइम वीडियोची आगामी बोल्ड आणि दमदार सीरिझ "पाताल लोक" घोषणेपासूनच चर्चेत आहे. निर्मात्यांनी या सीरीजमध्ये कथानकाशी प्रमाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि याच कारणामुळे 'पाताल लोक' देशातील विविध शहर आणि वस्त्यांमध्ये चित्रित करण्यात आली आहे. 'पाताल लोक'मधले वातावरण खरेखुरे आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असावे यासाठी दिल्लीच्या जवळपासच्या गावांमधील अगदी आतील भागांमध्ये जाऊन शूट करण्यासोबतच, चित्रकूटसारख्या शहरामध्ये जाऊन चित्रित करण्यात आले आहे. चित्रकूटसारख्या इंटेंस शहरामध्ये चित्रित झालेली ही पहिलीच सीरीज आहे.  

आपल्या चित्रकूटमधील चित्रीकरणाच्या अनुभवांविषयी सांगताना निर्माता सुदीप शर्मा म्हणाले की,"चित्रकूटमध्ये एखादा चित्रपट किंवा सिरीजचे चित्रीकरण झाले आहे, अशी ही पहिलीच घटना आहे. जेव्हा आम्ही चित्रीकरणाच्या रेकीसाठी चित्रकूटला गेलो होतो, तेव्हा आम्हाला हा प्रदेश आणि इथल्या मूलभूत पायाभूत सुविधांविषयी माहिती नव्हते. आम्हाला शूटिंगच्या इको-सिस्टमचे निर्माण अगदी सुरुवाती पासून करावे लागले. आमच्या सुदैवाने नुकतेच या ठिकाणी एक हॉटेल उघडले  होते आणि त्याची आम्हाला खूप मदत झाली. हे शहर जवळपास बनारस सारखेच शहर आहे, परंतु या ठिकाणी तेवढी गजबज नाही आहे." ( 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही प्रेक्षकांना भावतंय 'पाताल लोक') 

 

या बहुप्रतीक्षित क्राइम-थ्रिलर सीरीजला एक दोन नाही तर सहा शहरांमध्ये चित्रित करण्यात आले असून दिल्ली, गुड़गांव, रोहतक, चित्रकूट, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये याचे शूटिंग पार पडले आहे. 'पाताल लोक'च्या निर्मात्यांद्वारे याला  इंटेंस आणि चित्ताकर्षक बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत ज्याची झलक आपल्याला सीरीज च्या टीज़र आणि ट्रेलर मध्ये देखील पाहण्यास मिळाली आहे.

टीझर आणि रिलीजच्या सुरुवातीपासूनच, निर्मात्यांद्वारे एका नंतर एक, जयदीप अहलावत, अभिषेक बनर्जी आणि नीरज काबी यांचे करैक्टर पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. त्याचवेळी, ट्रेलर मधून उलगडणारी 'पाताल लोक' ची कहाणी एका अंतर्दृष्टिला स्पष्ट करत आपल्याला नरकाच्या प्रवेशद्वारावरून आत नेत आपल्या भयकंपित करून ठेवते. निर्माता सुदीप शर्मा (उडता पंजाब, एनएच 10 के लेखक) यांच्या द्वारे बहुप्रतीक्षित अमेज़ॅन ओरिजिनल सीरिझ  'पताल लोक' १६ मे, २०२० ला प्रदर्शित झाली आहे.