'पुष्पा 2' मधून अल्लू अर्जुनचा दमदार First Look आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा

सिनेमेटोग्राफरनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 31, 2022, 03:35 PM IST
'पुष्पा 2' मधून अल्लू अर्जुनचा दमदार First Look आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनं (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले. 'सामी सामी' आणि 'ऊं अंटावा' सारख्या गाण्यांपासून ते 'पुष्पा, झुकेगा नही...'पर्यंत 'पुष्पा'च्या गाण्यांपासून डायलॉग्सची क्रेझ प्रेक्षकांना लागली आहे. तेव्हापासून चाहते 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत होते. 'पुष्पा 2'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

'पुष्पा 2' च्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी 'पुष्पा: द रुल' म्हणजेच 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनचा लूक खूपच इंटेन्स दिसत आहे. हे शेअर करत कुबा ब्रोजेकनं लिहिले की, 'अॅडव्हेंचर सुरू आहे. अल्लू अर्जुनचे आभार. पुष्पा द रूल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनचा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांची उत्कंठा वेगळ्याच पातळीवर आहे आणि ते अभिनेत्याच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत. इतकंच नाही तर काही चाहत्यांनी असाही प्लॅन केला आहे की जेव्हा 'पुष्पा 2' (Pushpa The Rule) थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, तेव्हा अल्लू अर्जुनच्या एन्ट्रीवर ते काय करतील. अशी चर्चा कुबा ब्रोजेकच्या पोस्टवर काही चाहत्यांमध्ये सुरू होती. (Allu Arjun Pushpa 2 First Look Revealed Adventure Has Begun) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुष्पा: द राइज' 2021 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट आहे. त्यानंतर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिक कमाई केली. 'पुष्पा' संपूर्ण भारतामध्ये प्रचंड यशस्वी ठरला. 'पुष्पा'नं महामारीच्या काळात ज्या प्रकारे बक्कळ कमाई केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अल्लू अर्जुनला पॅन इंडियाचा स्टार बनवण्यात या चित्रपटाचा मोठा हात होता. सुकुमार 'पुष्पा 2' दिग्दर्शित करत आहेत. रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि विजय सेतुपती देखील या चित्रपटात दिसणार आहेत.