PICS: आलियाने स्वत:लाच दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करती आहे. 

Amit Ingole Updated: Mar 15, 2018, 10:05 AM IST
PICS: आलियाने स्वत:लाच दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करती आहे. 

या सिनेमाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर आणि मौनी रॉय हेही तिथे आहेत. या सिनेमाच्या सेटवर ती वाढदिवस साजरा करणार आहे. जगभरातील तिचे चाहतेही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत. अशात तिने स्वत:लाही जरा हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आलियाने तिच्या लवकरच रिलीज होणा-या ‘राजी’ सिनेमाच्या २५व्या दिवसाच्या शूटिंगचा फोटो शेअर केलाय आणि हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, सिनेमे माझ्यासाठी केवळ जगण्याचं साधन नाहीये तर मी सिनेमात करत असल्याने मला जीवन जगत असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी माझ्या २५व्या वाढदिवशी ‘राजी’ सिनेमाच्या २५व्या दिवसाच्या शूटचे दोन फोटो निवडले आहेत. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही २५ दिवसांनी म्हणजेच ९ एप्रिलला रिलीज होणार आहे’.