मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या करिअरची सुरूवात करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईअर' या कार्यक्रमातून केली आहे. तेव्हापासून अगदी आतापर्यंत आलिया भट्ट आपल्या अभिनयातून चाहत्यांना मस्त सरप्राईज देत आहे. आलियाने आपल्या 6 वर्षाच्या करिअरमध्ये चाहत्यांच मन जिंकला आहे. हायवे, उडता पंजाब या सिनेमातून तिने प्रेक्षकांना अचंबीत केलं. आता आलियाची चर्चा तिच्या रिलेशनशिपबद्दल होत आहे. आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत एक खास नातं शेअर करत आहे. तसेच आलिया ब्रम्हास्त्र सिनेमांत रणबीरसोबत स्क्रिन शेअर करत आहे.
डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हास्त्र सिनेमाबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, तिच्या या कॅरेक्टरमधून महिलांना प्रेरणा मिळेल. सिनेमांत ती एका अशा तरूणीची भूमिका साकारत आहे जी शक्तिशाली, युवा आणि शूर आहे. ती एका महत्वाकांक्षी महिलेची भूमिका साकारत आहे. आलियाने म्हटलं की, हा सिनेमा ट्रायलोजी आहे. रणबीरसोबत आलिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहे. मी कायम विचार करायची की रणबीर एक उत्तम अभिनेता आहे.
आलियाला जेव्हा रणबीरच्या नात्याबाबत विचारलं तेव्हा ती म्हणाली की, मला सत्याने कधीच फरक पडत नाही तर खोटेपणाने देखील फरक पडत नाही. रिलेशनशिपच्या अफवांमुळे माझं नातं काही खराब होत नाही. आता मला याची सवय झाली आहे. मी ज्या लाईमलाईच्या बिझनेसमध्ये आहे त्याचा हा भागचं आहे.