Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर करणार 'हे' काम

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर-आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत

Updated: Apr 14, 2022, 07:00 PM IST
 Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर करणार 'हे' काम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर-आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत. पूर्ण रितीरिवाजांसह सात फेरे घेऊन काही वेळापूर्वीच रणबीर आणि आलिया सात जन्मांसाठी एकमेकांचे बनले आहेत. लग्नाच्या निमित्ताने बॉलिवूडचे अनेक स्टार्स आशीर्वाद देण्यासाठी आले होते. आता ही बातमी समोर येत आहे की, रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्लॅन्सची.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया आजपासून त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. यानिमित्ताने नवविवाहित जोडपं रणबीर-आलिया यांना बाप्पाच्या आशीर्वादाने या खास क्षणाची सुरुवात करायची आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलियाच्या लग्नात संपूर्ण कुटुंब ऋषी कपूर यांची आठवण करून भावूक झालं आहे. लग्नादरम्यान ऋषी कपूर यांचा एक मोठा फोटोही ठेवण्यात आला होता. जो फुलांनी सजवण्यात आला होता. करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानीपासून अनेक सेलेब्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला पोहोचले होते. भावाच्या लग्नात करीना कपूर सैफ अली खानसोबत गुलाबी रंगाच्या साडीत दिसली होती. याशिवाय रिद्धिमा कपूरही शाही अंदाजात दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट संध्याकाळी ७ वाजता मीडियासमोर पोज देताना दिसणार आहेत. ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.