चला जेजुरीला जाऊ..! लग्नानंतर आलिया - रणबीर खंडोबाच्या दर्शनासाठी रवाना?

लग्नानंतर आलिया - रणबीर जेजुरीला देवदर्शनासाठी... फोटो व्हायरल   

Updated: Apr 21, 2022, 12:48 PM IST
चला जेजुरीला जाऊ..! लग्नानंतर आलिया - रणबीर खंडोबाच्या दर्शनासाठी रवाना?  title=

मुंबई : परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडपं जेजुरीला खंडेबाच्या दर्शनासाठी जातं. नुकताचं अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न झालं. लग्नानंतर आलिया आणि रणबीर सुद्धा जेजुरीला गेले असतील का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल... सध्या आलिया आणि रणबीरचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे जेजुरीला जाऊन आल्याचं दिसत आहे...

पण हा फोटो पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आलिया - रणबीरचा फोटो इडिट केला आहे. या फोटोवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. फोटो इडिट केलेला असला तरी फोटोमध्ये दोघे सुंदर दिसत आहेत. पाहा फोटो...

फोटोमध्ये रणबीरने आलियाला उचलून घेतलं आहे. आलिया आणि रणबीरचं लग्न झाल्यापासूनच अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केलं आहे. लग्नापूर्वी दोघांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगली होती. अत्यंत गुपित ठेवण्यात आलेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताचं चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

आलिया आणि रणबीर आधी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नानंतर जेजुरीला जाताना इडिटेड फोटो व्हायरल झाला होता. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं.