Aishwarya Rai Bachchan पुन्हा प्रेग्नंट? अमिताभ बच्चन बनणार आजोबा

ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या बच्चनचा हात धरून एअरपोर्टवर दिसली. 

Updated: Mar 7, 2023, 06:29 PM IST
Aishwarya Rai Bachchan पुन्हा प्रेग्नंट? अमिताभ बच्चन बनणार आजोबा title=

मुंबई : बॉलिवूडमधील स्टार्सच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांना फार उत्सुक्त असते. त्यात ऐश्वर्या राय बच्चन अनेक लोकांच्या मनात घर केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी ऐश्वर्या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवणाऱ्या या अभिनेत्रीचे काही फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. यामागचे कारणही तसंच आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा 'पोनीं सेल्वन-2'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनचा सुंदर लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.  बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. मात्र ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या बच्चनचा हात धरून एअरपोर्टवर दिसली. तिच्या स्टेपल ऑल-ब्लॅक पोशाखात, ऐश्वर्या आराध्याचा हात धरून एअरपोर्टकडे चालताना दिसली. तर, आराध्याने काळ्या रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता आणि अभिषेकने राखाडी जॉगर्ससह गुलाबी रंगाची हुडी घातली होती. संपूर्ण कुटुंबाने तोंडावर मास्क लावलं होतं. कौटुंबिक फोटो समोर आल्यानंतर आता ऐश्वर्या लवकरच दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एवढंच नव्हेतर लोकांना जो अंदाज बांधायचा आहे, तो त्यांनी बांधलाच आणि सोशल मीडियावर प्रश्न उपस्थीत करण्यास सुरूवात केली की, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे का? आता या चर्चांनी भलताच जोर धरला आहे.

मात्र ऐश्वर्या तिचा बेबी बंप तिचा काळा कोटने लपवतेय असं दिसतेय. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट बॉक्समध्ये ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचा दावा केला आहे. एका यूजरने कमेंट केली की, 'ती प्रेग्नंट आहे 
का? म्हणूनच तुम्ही स्वतःला संपुर्ण झाकताय. तर अजून एक  युजर म्हणाला, 'प्रेग्नंसी लपवायची काय?'  परंतु आत्तापर्यंत ऐश्वर्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या वतीने याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातम्या फक्त अफवा असल्याची शक्यता नाकारता येत नाही.