मुंबई : आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. 'पोनियाईन सेल्वन' आणि इराविन निजलसारख्या सुपरहिट चित्रपटात गाणारे गायक बंबा बक्या यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गाणं गायला सुरुवात केली आणि वयाच्या तीस वर्षांनंतर त्यांना बंबा बाक्या म्हणून लोक ओळखू लागले.
बंबा बक्या यांचे चेन्नईत आजारपणाने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. गुरुवारी अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्या आकस्मिक निधनानं त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. ते त्यांच्या गायनासाठी ओळखले जातात आणि रजनीकांत यांच्या '2.0', 'सरकार से सिमटांगरन', 'पुलिनंगल',‘बिगिल’ आणि ‘कलामे कलामे’ अशी अनेक गाणी गायली आहेत.
RIP singer #BambaBakya - known for his beautiful and unique voice. Raati, Pullinangal and the starting bit of Ponni Nadhi will always be special! pic.twitter.com/eUc5OsRrXg
— Siddarth Srinivas (@sidhuwrites) September 2, 2022
त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट मणिरत्नम आणि एआर रहमान यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटातील पोन्नी नाधी हे गाणे होतं. बंबा यांनी अनेकदा ए.आर. रहमानसोबत काम केलं. 2009 मध्ये, ए.आर. रहमाननं त्यांना रावण या त्यांच्या एका चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे बंबा बाक्या यशस्वी झाले. हे गाणं व्हायरल झाल्यानंतर बंबा बाक्या यांना सोलो गाणी गाण्याची संधी मिळाली.