Aishwarya Rai पाकिस्तानमध्ये, काय आहे नक्की प्रकरण?

पाकिस्तानमध्ये राहणारे

Updated: Dec 6, 2021, 07:43 PM IST
Aishwarya Rai पाकिस्तानमध्ये, काय आहे नक्की प्रकरण? title=

मुंबई : बॉलिवूड सेलेब्सचे लुक नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या डुप्लिकेट्स प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासारखी दिसणारी आमना इम्रान हिचा या यादीत समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये राहणारे लोक आमनाला ऐश्वर्याची डुप्लिकेट म्हणत होते आणि तेव्हापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऐश्वर्याची 'फोटो कॉपी' आमनाच्या हजारो फॅन्समध्ये आहे. 

तिचे सौंदर्य आणि स्टाईल देखील लोकांना आवडते आहे. आमना इम्रान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांचे खूप मनोरंजन करते. यावेळी आमनाने शेअर केलेल्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

होय, ऐश्वर्या रायची डुप्लिकेट आमना इम्रानने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची सुंदरता आणि तिची किलर ब्यूटी दिसत आहे. व्हिडिओमध्ये आमना 'कह दूँ तुममे या चुप राहून' या गाण्यावर लिप सिंक करत आहे.