लग्नानंतर पहिल्या बर्थडेला राहुल वैद्यला पत्नीने दिलं मोठं सरप्राईज

राहुल वैद्य आपला वाढदिवस दिशासोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. 

Updated: Sep 24, 2021, 02:29 PM IST
  लग्नानंतर पहिल्या बर्थडेला राहुल वैद्यला पत्नीने दिलं मोठं सरप्राईज title=

मुंबई : राहुल वैद्य आपला वाढदिवस दिशासोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. अभिनेता आणि गायक राहुल वैद्य 34 वर्षांचा झाला आहे आणि तो आपला वाढदिवस मालदीवमध्ये पत्नी दिशा परमारसोबत साजरा करत आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. दिशाने हा टी-शर्ट राहुल वैद्यला भेट दिला. 

हा सुंदर टी-शर्ट पत्नी दिशा परमारनं राहुल वैद्यला भेट दिला आहे.सुट्टीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या या सेलिब्रेशन आणि सुट्टीचे फोटो सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहेत .

राहुल वैद्यची अनोखी पोझ

या दरम्यान राहुल वैद्य जबरदस्त पोज देताना दिसले. आपल्या पोशाखात खूपच हटके दिसत आहे. तर दिशा परमारच्या सौंदर्याने ही मने जिंकली आहेत. यादरम्यान, गुलाबी बिकिनीमध्ये दिशा परमारच्या लूकनेही सर्वांच लक्ष वेधलं.

पूलमध्ये लुटला वाढदिवसाचा आनंद 
दिशा आणि राहुल यांनी पूलमध्ये वाढदिवसाची पार्टी एन्जॉय केली. या दरम्यान दोघांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होते.