गायन क्षेत्र गाजवणारा हा सुंदर चेहरा आता अभिनयात करणार दमदार एंट्री 

ही गायिका गाण्याव्यतिरिक्त आता चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे

Updated: Mar 17, 2022, 04:47 PM IST
गायन क्षेत्र गाजवणारा हा सुंदर चेहरा आता अभिनयात करणार दमदार एंट्री  title=

मुंबई : आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावणारी गायिका ध्वनी भानुशाली सध्या चर्चेत आहे. कारण तिच्याबद्दल एक रंजक बातमी समोर येत आहे.  ध्वनी भानुशाली गाण्याव्यतिरिक्त आता चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. ही बातमी ऐकून ध्वनीचे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत आणि आता तिला लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर पाहाणार आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनावर राज्य करणारी ध्वनी भानुशाली कितपत अप्रतिम अभिनय दाखवू शकते हेच पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एका अहवालानुसार, 'ध्वनी भानुशाली तिच्या मोठ्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे आणि यावेळी ती अभिनय आणि तंत्राच्या विविध पैलूंवर काम करत आहे. तिला तिचे वडील विनोद भानुशाली लॉन्च करतील अशी शक्यता आहे. विनोद भानुशाली यांनी नुकतीच टी-सीरिज कंपनी नुकतीच सोडली होती. T-Series सह 27 वर्षांच्या प्रदीर्घ सहवासानंतर विनोद यांनी आता स्वतःचं प्रोडक्शन हाऊस 'भानुशाली स्टुडिओ लिमिटेड' लाँच केलं आहे.

विनोद भानुशाली यांनी निर्मिती व्यवसायात प्रवेश केल्यानंतर 'जनहित में जरी' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा हिला कास्ट करण्यात आल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे, 'भानुशाली स्टुडिओज लिमिटेड'बद्दल बोलायचं झालं तर, या प्रॉडक्शन हाऊसने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

दरम्यान, ध्वनी भानुशालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने तिच्या आवाजाची जादू चालवत अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली आहेत. यासोबतच ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. त्यापैकी त्यांच्या  'वासते' गाण्यांना  1 बिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजही तिचे चाहते ध्वनीच्या नव्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.