सिद्धार्थच्या निधनाचा शेहनाज गिलवर मोठा परिणाम, खाणं-पिणं ही सोडलं?

 एका न्यूज पोर्टलमध्ये सांगण्यात आले आहे की शेहनाजला नीट झोपत देखील लागत नाही.

Updated: Sep 7, 2021, 10:32 AM IST
  सिद्धार्थच्या निधनाचा शेहनाज गिलवर मोठा परिणाम, खाणं-पिणं ही सोडलं? title=
मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लाचे कुटुंब आणि गर्लफ्रेंड शेहनाज गिल या धक्क्यातून स्वतःला बाहेर काढू शकलेले नाहीत. शेहनाज गिल सिद्धार्थ शुक्ला या जगात नाही यावर विश्वास ठेवायला तयार नाही, ती अजूनही त्याच्या आठवणींमध्ये हरवली आहे. सिद्धार्थच्या घरी गेलेल्यांनी शेहनाजची प्रकृती ठीक नसल्याचे उघड केले आहे.
 
त्याला पूर्ण धक्का बसला आहे. एका न्यूज पोर्टलमध्ये सांगण्यात आले आहे की शेहनाजला नीट झोपत देखील लागत नाही, तिने जेवणं देखील सोडून दिलं आहे. ती नीट काही खात देखील नाही. एवढेच नाही तर ती कुणाशीही बोलत नाही.
 
अहवालात म्हटले आहे की, 'स्वतःला या धक्क्यातून बाहेर काढणे इतके सोपे नाही आणि शेहनाज काही काळ शॉकमध्ये राहील. दुःखाची गोष्ट म्हणजे ती झोपत नाही किंवा व्यवस्थित खात नाही. या परिस्थितीत तिला एकटे सोडले जाऊ शकत नाही आणि सिद्धार्थची आईसुद्धा या कठीण काळात शेहनाजची साथ सोडत नाही आणि अभिनेत्रीला या काळात लढण्यासाठी धैर्य देत आहे.
 
अहवालात असेही म्हटले आहे की, शेहनाजनेच सिद्धार्थला त्याच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी वेगळ्या अवस्थेत पाहिले, शेहनाजला तो क्षण तिच्या हृदयातून बाहेर काढता येत नाही. स्मशानभूमीतील शेहनाजच्या फोटोंनी सर्वांचा भावूक केले होते.
 
तिची स्थिती पाहिल्यानंतर राहुल महाजन यांनी सांगितले की, 'तिची प्रकृती वाईट आहे. जेव्हा शेहनाज स्मशानभूमीत आली, तेव्हा ती खूप मोठ्याने ओरडली, मम्मी जी माझा मुलगा, मम्मी जी माझं मूल. '