सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा अभिनेत्रीला धक्का, तातडीने हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीचा माझ्यावर इतका वाईट परिणाम झाला.

Updated: Sep 7, 2021, 08:29 AM IST
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा अभिनेत्रीला धक्का, तातडीने हॉस्पिटलमध्ये केलं दाखल title=

मुंबई : बिग बॉसची एक्स स्पर्धक जसलीन मथारू म्हणाली की, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे. सिद्धार्थच्या जाण्याचा तिला मोठा धक्का बसला आहे. जसलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेडवर झोपलेली दिसत आहे. तिला सलाईन लावण्यात आलेली आहे. 

चाहत्यांच्या वाईट कमेंट 

व्हिडिओमध्ये जसलीन म्हणते, ज्या दिवशी सिद्धार्थचा मृत्यू झाला, मी त्याच्या घरी गेले. त्याच्या निधनाची बातमी ऐकून मला वाईट वाटले पण जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचले आणि तेथील वातावरण पाहिले, तेव्हा मी खूप हादरले. जेव्हा मी शेहनाज गिल आणि सिद्धार्थच्या आईला भेटून घरी परतले, तेव्हा मला असे मेसेज आले की , तू पण मर. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीचा माझ्यावर इतका वाईट परिणाम झाला. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अभिनेत्री जसलीनला सोशल मीडियावर वाईट बोललं जातं आहे. तिला धमक्या दिल्या जात आहेत.

अभिनेत्री बसला धक्का 

मी स्वतःला सांगितले, आयुष्य इतके अप्रत्याशित आहे, सर्व काही विचित्र वाटले. मला माहित नाही काय झाले. मला खूप ताप आला आणि मला अॅडमिट व्हावं लागलं. तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि मी लवकर बरे व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करा.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 सिद्धार्थच्या निधनाचा शेहनाजवर परिणाम

यापूर्वी, जसलीनने सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत शहनाज गिलबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, मी शहनाजशी बोलले. तिची प्रकृती चांगली नाही. ती पूर्णपणे कोलमडली आहे, काहीही बोलत नाही, तिच्या स्वतःच्या जगात हरवली आहे.