सलमानच्या शोमध्ये अश्लील चाळे: लेकीचा इंटिमेट व्हिडीओ पाहून आई-वडील म्हणाले- लाज वाटते!

Isha Malviya and Samarth Jurels Intimate Video :  ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलचे 'बिग बॉस 17' मधील अश्लील चाळे पाहताच अभिनेत्रीच्या आई-वडिलांना वाटली लाज. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 6, 2023, 12:11 PM IST
सलमानच्या शोमध्ये अश्लील चाळे: लेकीचा इंटिमेट व्हिडीओ पाहून आई-वडील म्हणाले- लाज वाटते! title=
(Photo Credit : Social Media)

Isha Malviya and Samarth Jurels Intimate Video : 'बिग बॉस 17' ची स्पर्धक ईशा मालवीय ही सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल शोमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांसमोर ईशाची एक अशी बाजू आली ज्याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. तर दुसरीकडे प्रेक्षक तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि स्पर्धक अभिषेक कुमारच्या बाजूनं बोलू लागले होते. दरम्यान, ईशा आणि समर्थ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या दोघांचा हा इंटिमेट व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलयानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे. अशात आता तिच्या आई-वडिलांना बिग बॉसच्या घरातून बाहेर आणायचे आहे. याचा खुलासा 'उड़ारियां' या मालिकेत इशासोबत काम करणारा अभिनेता लोकेश बट्टानं खुलासा केला आहे.

गेल्या एपिसोडमधअये अभिषेक कुमारनं हा दावा केला होता की ईशा जेव्हा मालिकेत होती तेव्हा ती कोणाला दुसऱ्याला डेट करत होती. तर 'पिंकव्हिला' नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार ईशा ही अभिषक आणि समर्थ आधी लोकेश बट्टासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 'पिंकव्हिला' ला दिलेल्या मुलाखती दरम्यान, 'लोकेशनं याविषयी स्पष्ट नकार दिला आहे. लोकेश म्हणाला की आम्ही चांगले मित्र होतो. अनेकदा आम्ही सेटवर एकत्र जायचो. मी तिच्या घरी देखील गेलो आहे. मी तिच्या आईला भेटलो आहे. पण, आम्ही कधी एकमेकांना डेट केलं नाही.'

लोकेशनं ईशाच्या 'बिग बॉस'मध्ये असलेल्या प्रवासाविषयी त्याला काय वाटतं ते सांगितलं. 'अंकित गुप्ता आणि प्रियांका चाहर चौधरीला पाहिल्यानंतर ईशाला देखील बिग बॉस करायचं होतं. ते खूप आतुरतेनं निर्मात्यांची प्रतिक्षा करत होती की ते कधी तिला कॉल करून शोमध्ये येण्याविषयी विचारतील. मात्र, मी तिच्या आईला विनंती करत सांगितलं होतं की तिला कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये जाऊ देऊ नका. मी त्यांना आधीच सतर्क केलं होतं की ईशाची प्रतिमा मलिन होऊ शकते आणि बघा तसंच झालं आहे. ईशाच्या आईनं मला फोन केला होता. त्या चिंतेत आहेत,' असं लोकेश म्हणाला. 

हेही वाचा : 'हा तुझा फॅमिली शो?' 20 वर्षांच्या अभिनेत्रीचा इंटिमेट व्हिडीओ पाहताच सलमानवर भडकले नेटकरी

लोकेश त्याचं वक्तव्य पुढे म्हणाला की 'समर्थची एन्ट्री झाल्यानंतर सगळ्यांची सहानुभूति ही अभिषेककडे गेली. तर ईशाची प्रतिमा निगेटिव्ह झाली. ही गोष्ट ईशाच्या आई-वडिलांना आवडली नाही. ईशाच्या आई-वडिलांना माहित नव्हतं की त्यांची मुलगी आणि समर्थ रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना आता ईशाला शोमधून बाहेर काढायचे आहे, पण कॉन्ट्रॅक्टमुळे ते थांबले आहेत. ईशा आणि समर्थच्या किसवर तिच्या आईचा आक्षेप आहे. ईशाचे वडील हे सरकारी कार्यालयात काम करतात. ते देखील ईशावर नाराज आहेत. ईशाच्या आईनं सांगितलं की समर्थ आल्यापासून ती आधी प्रमाणे शो पाहू शकत नाही आहे.'