नवी दिल्ली : बिग बॉस सिझन 11 मध्ये दिसलेली मॉडेल अर्शी खान सध्या वेगवेगळे स्टेज शो करताना दिसतेय. गेले काही दिवस ती राखी सावंत आणि सपना चौधरी यांच्यासोबत स्टेज शो मध्ये सहभागी होतेय. एका विदेशी रेसलरने मारल्याने राखी सावंतचं कंबरड मोडल्याचा व्हिडिओ काही दिवसांपुर्वीच समोर आला होता. राखीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कराव लागलं. आपल्यासोबत धोका झाल्याचा खुलासाही राखीने केला होता. द ग्रेट खलीनेही हॉस्पीटलमध्ये जाऊन राखीची भेट घेतली. आपण त्या विदेशी रेसलरचा बदला घेणार असल्याचेही राखीने सांगितलंय. सध्या अर्शी खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आहे.
अर्शीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलायं. यामध्ये ती डान्स करताना दिसतेयं. बिग बॉसच्या घरात स्वत:ला जनतेचा आवाज म्हणवणारी अर्शी इथे वेगवेगळ्या गाण्यावर थिरकताना दिसतेय.
पंचकूलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनरखाली आयोजन करण्यात आलं होतं.अंबाला शहरात कुस्तीची स्पर्धा होती.
इथे देशविदेशातून स्पर्धक आले होते. या इव्हेंटचं प्रमोशन राखी सावंत आणि अर्शी खानने केलं. रविवार (11 नोव्हेंबर) एक मोठी फाइट झाली होती.
या इव्हेंटमध्ये पुरूष रेसलेरांसोबत महिला रेसलर्सही स्पर्धेत होत्या. अशाच एका स्पर्धेत एका विदेशी महिला रेसलरने खुलं आव्हान दिलं.
'जर कोणत्या भारतीय महिला रेसलरमध्ये दम असेल तर माझ्याशी फाइट करावी', असं ती म्हणाली.
हे ऐकताच राखी सावंत डान्स करत रिंगमध्ये पोहोचली आणि त्या रेसलर चॅलेंज केलं की 'माझ्या सारखा डान्स करून दाखवं.'
यावर चिडलेल्या रेसलरने राखीने आपटून आपटून मारलं.