पूजानंतर सुधांशुने केली करणची पाठराखण

करणला मी गेल्या २० वर्षांपासून ओळखत असल्याचे वक्तव्य सुधांशुने केले.

Updated: May 8, 2019, 08:03 PM IST
पूजानंतर सुधांशुने केली करणची पाठराखण title=

मुंबई : टीव्ही अभिनेता करण सिंग ओबेरॉयवर केलेल्या गंभीर आरोपानंतर पूजा बेदीने त्याचे समर्थन केले. त्यांनंतर गायक आणि अभिनेता सुधांशु पांडेने करणची पाठराखण केली आहे. करणला मी गेल्या २० वर्षांपासून ओळखत असल्याचे वक्तव्य सुधांशुने केले. या दोघांनी 'बॅंड ऑफ ब्यॉज' चित्रपटात एकत्र काम केले होते. ते केवळ चांगले मित्र नसुन चांगले शेजारी देखील राहिले आहेत.

सुधांशु म्हणाला की, 'मी फक्त सुधांशुला ओळखत नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला ओळखतो. करणचे वडील सेना अधिकारी होते. त्याची बहिण व्यावसायिक आहे. त्याचप्रमाणे तो सुद्धा मर्चेंड नेवीमध्ये होता, त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात आपला पाय ठेवला. त्याला कोणासोबतही गौरवर्तन करताना मी पाहिले नाही.'
  
करणवर एका महिलेने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आरोपाखाली अटक त्याला करण्यात आली आहे. याप्रकरणी ओशिवारा पोलीस स्थानकांत एफआयआर दाखल करण्यात आली होती.

महिलेने केलेल्या तक्रारीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तसेच त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. व्हिडिओ दाखवून महिलेकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही करणवर लावण्यात आला आहे.