औरंगाबाद : राज्यात मराठा आंदोलन पेटले असतांनाच आता मुस्लीम आरक्षणासाठी मुस्लीम समाज ही आंदोलनाच्या भूमिकेत आहे. औरंगाबादेत घेण्यात आलेल्या बैठकीत मुस्लीम आणि राजकीय संघटना उपस्थित होत्या. मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं नाही तर 3 ऑगस्टला औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. तर १० तारखेपासून राज्यात आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला.
औरंगाबादमध्ये एआयएमआयच्या आमदाराने म्हटलं की, "सरकार फक्त मराठ्यांसाठी बोलत आहे. धनगरांसाठी कोण बोलणार?. धनगरांचे प्रतिनिधी विधानसभेत कमी आहेत. मुस्लिमांसाठी देखील कोणी बोलणार नाही. मुंबई हायकोर्टाने म्हटलं की, मुस्लिमांना 5 % आरक्षण दिलं पाहिजे पण का तुम्ही त्यावर चर्चा करत नाही.' जे पक्ष कधी मराठा आरक्षणावर बोलत नव्हते ते पक्ष देखील आरक्षणावर बोलायला लागले आहेत.
दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी देखील मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. त्यांनी म्हटलं की, "मागील 4 वर्षापासून विधानसभेत आम्ही मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करत आहोत. कोर्टने जसं म्हटलं की, त्यावर चर्चा केली पाहिजे. पण सरकार यावर गप्प आहे. सरकार फक्त आपल्याचं लोकांना आरक्षण देत आहे."