पतीच्या निधनानंतर Mandira Bedi ने या दिवाळीत 'जे' केलं, सर्वच आश्चर्यचकीत !

इंस्टाग्रामवर तुटलेल्या हृदयाचा इमोजीही शेअर केला आहे.

Updated: Nov 4, 2021, 05:34 PM IST
पतीच्या निधनानंतर Mandira Bedi ने या दिवाळीत 'जे' केलं, सर्वच आश्चर्यचकीत ! title=

मुंबई : एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत, 'ग्लॅम अँड ग्लिटर' गर्दीत मंदिरा बेदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती साडीत अगदी हटके दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचे जुलैमध्ये निधन झाले. त्यानंतर मंदिराने त्यांच्या स्मरणार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. राजशिवाय तिची ही पहिलीच दिवाळी आहे. यानिमित्ताने तिने इंस्टाग्रामवर तुटलेल्या हृदयाचा इमोजीही शेअर केला आहे.

ग्लॅमरमध्ये मंदिराची नजर

एकता कपूरच्या दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मौनी रॉय, हिना खान, हरलीन सेठी, आशा नेगी, करिश्मा तन्ना यांच्यासह अनेक अभिनेत्री या सेलिब्रेशन पार्टीला पोहोचल्या होत्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 

मंदिरा बेदीही आपल्या मुलांसह पार्टीत सहभागी झाली होती. सोशल मीडियावर हे फोटो आल्यानंतर लोक मंदिरा बेदीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तर तिच्या साध्या लूकवर देखील चर्चा होत आहे.