Amitabh Bachchan : एकीकडे बॉलिवूडमध्ये सगळीकडे अशांतता पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जवळचे सगळेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ते त्यांचे केस ठीक करताना दिसत आहे. त्यावरून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे आणि इतकंच नाही तर त्याला लाजिरवाणी गोष्ट म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते त्यांचे केस स्टाईल करताना दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की केस स्टाईल करताना. अमिताभ यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला अनेक गोष्ट सुनावल्या आहेत. एक नेटकरी अमिताभ यांना टोमना मारत म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे आणि त्यांना हसायला येतंय. हे महानायक आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, मुंबईत एक हत्या झाली आणि तुम्हाला काही वाटायला हवं होतं. तुम्हाला कसं काही वाटत आहे. तुम्ही पब्लिक फीगर आहात लोकांना तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, महानायक असण्याचा काय फायदा, इतकं असूनही सुरक्षेवर सरकारच्या विरोधात काहीही बोलू शकले नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला, मुंबईच्या माजी मंत्री आणि त्यांचे जवळच्या मित्राची हत्या झाली. त्यांना ही गोष्ट कळली की त्यांच्या मित्राची हत्या झाली. त्यांना ही गोष्ट तर लक्षात असेल तरी सुद्धा बघा.
T 5162 - बाल संवारते हुए pic.twitter.com/uyO3RB1Bo1
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 13, 2024
दरम्यान, शनिवारी रात्री एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनं संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सलमान खान ते संजय दत्त, शिल्पा शेट्टी, शहनाज गिल, सना खान, सोहेल खान, झहीर इकबालसोबत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.