मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. याचबरोबर रोहमनसोबत ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली होती. सुश्मिता बॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री आहे. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक शानदार चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुष्मिता सेन चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सुष्मिता सेनच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
सुष्मिता सेन तिच्या चित्रपटांमधून मोठी कमाई करते. चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करून उत्तम नफा कमावते. सेलिब्रिटींच्या अहवालानुसार, या दिग्गज अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 80 कोटी आहे.
सुष्मिता सेनचं स्वतःचं अतिशय आलिशान घर आहे. मुंबईतील वर्सोवा भागात तिचं घर आहे. सुष्मिताने तिच्या आलिशान घरात तिला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे जसं की आलिशान क्रिस्टल झुंबर, वृक्षारोपण केलेले इंटीरियर डिझाइनिंग आणि उत्कृष्ट कलाकृती देखील आहेत. सुष्मिताच्या या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
लक्झरी गाड्या
याशिवाय सुष्मिता सेनला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये 1.38 कोटी रुपयांची BMW 7 Series 730LD, 96.03 लाख रुपयांची BMW X6, 75 लाख रुपयांची Audi Q7 आणि 35 लाख रुपयांची Lexus LX 470 यांचा समावेश आहे.
प्रवासाची आवड आहे
यासोबतच या बॉलिवूड अभिनेत्रीला बाहेर फिरण्याचीही खूप आवड आहे. इटली, इंडोनेशिया, दुबई आणि मालदीव यांसारख्या तिच्या आवडत्या ठिकाणी ती सुट्टी घालवण्यासाठी जात असते. सुष्मिता सेन देखील तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर तिचे व्हेकेशन फोटो शेअर करत असते.