तो गेला 11 दिवस उलटले, पण स्मशानाबाहेरचीही रांग संपता संपेना....

याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 12, 2021, 06:43 PM IST
 तो गेला 11 दिवस उलटले, पण स्मशानाबाहेरचीही रांग संपता संपेना.... title=

मुंबई : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचे लाखो चाहते त्यांच्या निधनाच्या दुःखातून अद्याप सावरलेले नाहीत. दिवंगत चित्रपट कलाकाराच्या निधनाला 11 दिवस पूर्ण झाले आहेत. जिथे पुनीत राजकुमारचे हजारो चाहते जमले होते.

याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहते रांगेत उभे होते.

Karnataka government allows entry of fans to Kannada actor Puneeth  Rajkumar's samadhi | Entertainment News – India TV

येथे पोहोचल्यानंतर भावूक लोकांनी पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली आणि आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) याचं 29 ऑक्टोबर 2021 रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Puneeth Rajkumar (@PuneethRajkumar) / Twitter

अवघ्या 46 व्या वर्षी पुनीतने या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.