Adipurush Movie controversy In Mumbai : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा वाद थांबवण्याचे नाव घेत नाहीये. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी देखील जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अगदी सिनेमॅटोग्राफीमधील डायलॉगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इतकंच नाही तर सिनेमाचे डायलॉग टपोरी फॉरमॅटमध्ये आहेत, असे अनेकजण सांगत आहेत. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. याचदरम्यान मुंबईतील एका थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. काही हिंदू संघटनांनी चित्रपटाचे शो बंद पाडले व गोंधळ घातला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'आदिपुरुष' चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती मात्र आता बहुतांश लोकांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. 'आदिपुरुष' चित्रपटातील काही सीन, संवादांना आणि कलाकारांचे लूक याला प्रेक्षकांचा कडाडून विरोध होत आहे. भगवान श्रीराम आणि रामायणापबाबत अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर सातत्याने होत आहे.
#WATCH | Maharashtra | Members of a few Hindu organisations created a ruckus at a multiplex in Nalasopara, Palghar on Sunday, 18th June while the film #Adipurush was being screened there. The protesters stopped the screening of the film, raised slogans and entered into a verbal… pic.twitter.com/b7BBDKPigm
— ANI (@ANI) June 19, 2023
त्यातच काही हिंदू संघटनानी तर आक्रमक चित्रपटसृष्टीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालघर येथील एका मल्टिप्लेक्समध्ये रविवार, 18 जून रोजी 'आदिपुरुष' चित्रपटाचा शो सुरु होता. त्याचवेळी काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले, घोषणाबाजी केली आणि मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी चांगलाच वाद घातला. या गोंधळचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे.
“तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का? आम्ही आमच्या देवाचा अपमान सहन करु शकत नाही. आमच्या देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही निषेध करू. आम्हाला फासावर चढावं लागलं तर तेही करु पण अपमान सहन करणार नाही, असं म्हणत या लोकांनी गोंधळ घातला आहे."